Maize Market : मका आवक घटली

Maize rate : खानदेशात मक्याची आवक एप्रिल, मे महिन्यात स्थिर होती. नंतर आवक सतत कमी झाली आहे. मक्याची काही शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती.
Maize Market
Maize MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgoan News : खानदेशात मक्याची आवक एप्रिल, मे महिन्यात स्थिर होती. नंतर आवक सतत कमी झाली आहे. मक्याची काही शेतकऱ्यांनी साठवणूक केली होती. याच शेतकऱ्यांकडून बाजारात आवक होत आहे. प्रमुख बाजारांत मिळून सध्या ६०० क्विंटलदेखील आवक होत नसल्याची स्थिती आहे.

एप्रिल व मे महिन्यात मका आवक वाढली. या कालावधीत क्विंटलला किमान १६०० व कमाल १९०० रुपये दर होते. दरवाढीची प्रतीक्षा व कमी लागवड यामुळे बाजारातील आवक कमी राहील, असा अंदाज त्या वेळेस होता. परंतु आवक चांगली होती. जळगाव जिल्ह्यात मक्यासाठी चोपडा, जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर व दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारातील नंदुरबार व शहादा येथील बाजार प्रसिद्ध आहेत.

Maize Market
Maize Grower Issue : केंद्राच्या हस्तक्षेपामुळे मका उत्पादक अडचणीत

या बाजारांत मक्याची आवक एप्रिलमध्ये उच्चांकी होती. एप्रिलमध्ये सरासरी सात हजार क्विंटल प्रतिदिन आवक प्रमुख बाजारांत झाली. मे मध्येही काही दिवस प्रतिदिन साडेसात हजार क्विंटल मक्याची आवक झाली. परंतु या काळात दरपातळी कमाल १९०० पेक्षा अधिक झाली नाही. जागेवर १६०० ते १९०० रुपये दर शेतकऱ्यांना शिवार खरेदीत मिळाला. तर बाजारांत लिलावात कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही चोपडा, अमळनेर व दोंडाईचा येथे मे मध्ये मिळाला.

मक्याची लागवड खानदेशात रब्बीमध्ये सतत कमी झाली आहे. ही लागवड सुमारे ६२ हजार हेक्टरवर झाली होती. जळगाव जिल्ह्यातील लागवड सुमारे ४४ हजार हेक्टरवर झाली होती. जळगाव जिल्ह्यात ५० ते ५५ हजार हेक्टरवर मका लागवड केली जात होती. पण लष्करी अळीचा प्रादुर्भाव, कमी दर, वाढलेला उत्पादन खर्च, मजूरटंचाई आदी कारणांमुळे लागवड कमी झाली. मका मळणी मार्चच्या अखेरीस सुरू झाली. मळणीला एप्रिलमध्ये वेग आला. यात आगाप लागवडीच्या मक्याची मळणी मार्चमध्येच पूर्ण झाली. अनेक शेतकऱ्यांच्या मक्याची मळणी एप्रिलमध्ये पूर्ण झाली.

Maize Market
Maize Market : मलकापुरात मक्याला सरासरी २३०० रुपयांचा दर

मका आवक धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, अमळनेर व जळगाव या बाजारात सुरवातीपासून चांगली होती. पण ही आवक गेल्या २० ते २२ दिवसांपासून सतत कमी झाली आहे. अनेकांनी मका साठवून ठेवणे शक्य असल्याने त्याची गोदामात, घरात साठवणूक केली. त्याचे फारसे नुकसान झाले नाही. आता दरवाढ झाल्यानंतर बाजारात त्याची विक्री सुरू आहे. परंतु बाजारात मक्याची आवक अल्प आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर येथील बाजारात मक्याची आवक सध्या प्रतिदिन ४०० ते ४५० क्विंटल आहे.

दर स्थिर राहण्याचे संकेत

जळगाव व चोपडा येथेच काही प्रमाणात मका आवक होते. व्यापारी व मोठे खरेदीदार यांच्यात सौदे होत आहेत. कमाल दर २३५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. तर किमान दर १८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दरात काहीशी सुधारणा मागील २० ते २२ दिवसांत झाली आहे. शेतकऱ्यांकडून आवक कमी आहे. पुढेही दर स्थिर राहतील, असे संकेत बाजारातील जाणकारांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com