CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रांत ‘हमाली’सह ‘खुशाली’तून लूट

Cotton Rate : कापूसदरात मोठी घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांची व्यापारी व अन्य मंडळी लुटालूट करीत आहेत. त्यात शासकीय यंत्रणादेखील मागे नाहीत.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon

Jalgaon News : कापूसदरात मोठी घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांची व्यापारी व अन्य मंडळी लुटालूट करीत आहेत. त्यात शासकीय यंत्रणादेखील मागे नाहीत. भारतीय कापूस महामंडळांच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांत शेतकऱ्यांकडून हमालीपोटी क्विंटलमागे २० ते ३० रुपये वसूल केले जात आहेत. कापूस अधिक असल्यास हमालीव्यतिरिक्त खुशालीदेखील कर्मचारी मागत आहेत. त्याची कुठलीही पावती दिली जात नाही. तसेच कोणतीही नोंद केली जात नसल्याची स्थिती आहे.

खासगी खरेदीदारांकडे कापसाचे दर कवडीमोल स्थितीत आहेत. कापसाला उठाव नाही. फरदड, कवडी, अशी कारणे सांगून कमी दर देण्याचा प्रकार व्यापारी गावोगावी करीत आहेत. यात ‘सीसीआय’च्या जाचक अटी, नियम पूर्ण करून अनेक शेतकऱ्यांनी शासनास कापसाची विक्री केली आहे. परंतु तेथेही लूट होत असल्याच्या तक्रारी शेतकरी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगत आहेत.

Cotton Rate
Cotton Market : कापूस, हरभरा, सोयाबीनच्या दरात घट

‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर तेथे तोलकाट्यावर कापसाची तोलाई केली जाते. या तोलाईचे ८० ते १०० रुपये शेतकऱ्याला खर्च करावे लागतात. यानंतर कापूस साठवणगृह किंवा साठवणीसंबंधीच्या भागात आणल्यानंतर तेथे तो वाहनातून काढून ढीगावर टाकला जातो.

कापूस वाहनातून काढण्यासंबंधी किंवा या हमालीसाठी विविध खरेदी केंद्रांत वेगवेगळे दर आकारले जात आहेत. त्यासाठी एक क्विंटलमागे २० ते ३० रुपये आकारणी होत आहे. काही केंद्रांत सरसकट ४० रुपये प्रतिक्विंटल हमाली शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात आली आहे.

Cotton Rate
Soybean Cotton Market : सोयाबीन, कापसाच्या सरकारी खरेदीची मागणी

बाजार समिती, केंद्रचालकांचे कारवाईकडे दुर्लक्ष

कापूस अधिक असल्यास हमालीव्यतिरिक्त खुशालीदेखील संबंधित कर्मचारी मागतात. त्यापोटी शे-दोनशे रुपये वेगळे द्यावे लागतात. या हमालीच्या पैशांची कुठलीही पावती शेतकऱ्याला दिली जात नाही. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा, जामनेर तालुक्यातील ‘सीसीआय’च्या केंद्रांत हा प्रकार सर्रास झाला आहे, अशी माहिती एका शेतकऱ्याने दिली.

संबंधित बाजार समिती व केंद्रचालक याबाबत कोणतीही कारवाई करायला तयार नाही. या खर्चामुळे शेतकऱ्यांचा नफा मात्र सरसकट कमी होत असून, आर्थिक फटका बसत आहे. शासकीय यंत्रणा, बाजार समित्यांनी याबाबत कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com