Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Lemon Rate : मॉन्सूनोत्तर आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे अवेळी ताण तुटल्याने लिंबाचा हंगाम लांबला.
Lemon Rate Hike
Lemon Rate HikeAgrowon

Amaravati News : मॉन्सूनोत्तर आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे अवेळी ताण तुटल्याने लिंबाचा हंगाम लांबला. त्यामुळे मार्च महिन्यात अमरावती बाजारात लिंबाच्या दरात तेजी येत त्याचा दर ८,५०० रुपये क्‍विंटलवर पोहोचला होता. आता मात्र पुन्हा अवकाळी पावसाच्या परिणामी गारवा वाढल्याने त्याचा फटका लिंबू बाजाराला बसला असून, हे दर ४,००० ते ५,००० रुपयांवर आले आहेत.

अमरावती जिल्ह्यात सुमारे २५० हेक्‍टरवर लिंबाची लागवड आहे. त्यातील सर्वाधिक ८० हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या नांदगाव खंडेश्‍वर परिसरातील माऊली (चोर) परिसरात असल्याचे सांगण्यात येते. या भागातून विदर्भातील प्रमुख बाजारात लिंबाचा पुरवठा होतो. त्यासोबतच अकोला जिल्ह्यातील वाडेगाव भागातही लिंबाच्या बागा आहेत.

ही दोन गावेच लिंबाचे प्रमुख उत्पादक आणि पुरवठादार आहेत. आंबिया आणि हस्त बहारातील लिंबू फळांची उपलब्धता फेब्रुवारीपासून होते. परंतु यंदा नोव्हेंबर महिन्यात झालेला मॉन्सूनोत्तर पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे हा हंगाम लांबला. या हंगामातील लिंबू फळे आता थेट एप्रिल महिन्यात उपलब्ध होतील, अशी माहिती लिंबू बागायतदार अंकुश झंझाट यांनी दिली.

Lemon Rate Hike
Lemon Market : खानदेशात लिंबू आवक कमीच

दरम्यान, तापमानात वाढ झाल्याच्या परिणामी ग्राहकांकडून लिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळेच बाजारात लिंबाचे दर चांगलेच तेजीत आले आहेत. महिन्याच्या सुरुवातीला ४,००० ते ६,००० रुपयांचा दर लिंबाला असताना मार्चच्या मध्यापर्यंत हे दर थेट ८,५०० रुपये क्‍विंटलवर पोहोचले होते.

किरकोळ बाजारात तर सरासरी १०० रुपये किलोने लिंबू फळांचे व्यवहार झाल्याचे अंकुश झंझाट यांनी सांगितले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला लिंबाची आवक वाढली होती. त्यामुळे दर दबावात आले. आता मात्र दरात काहीअंशी सुधारणा झाली आहे. ४,००० ते ५,००० रुपयांचा दर लिंबाला मिळत असून आवक अवघी २० क्‍विंटलची आहे.

Lemon Rate Hike
Lemon Rate : लिंबाचे दर दबावात

कळमना बाजारात ६५०० रुपयांचा दर

नागपूरच्या कळमना बाजारात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ६,००० ते ७,००० रुपये क्‍विंटल असा दर लिंबाला मिळाला. आवक ३० ते ५० क्‍विंटल अशी मर्यादित होती. त्यानंतर ५,००० ते ७,००० रुपयांनी लिंबाचे व्यवहार झाले. आता पुन्हा लिंबू दराने ५,००० ते ६,५०० रुपये क्‍विंटलचा पल्ला गाठला आहे.

ॅमॉन्सूनोत्तर पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वातावरणातील बदलाचा फटका बसत लिंबाचा हंगाम लांबला होता. आंबिया आणि हस्त बहारातील लिंबाची फळे यंदा एप्रिल महिन्यात उपलब्ध झाली. दुसरीकडे मार्च महिन्यात तापमानात वाढ झाल्याने लिंबाला मागणी वाढली होती. त्याचा परिणाम दरावर होत ते तेजीत आले. सरासरी ८५०० रुपये क्‍विंटलप्रमाणे लिंबाचे घाऊक व्यवहार होत किरकोळ दर १०० ते १२० रुपये किलोपर्यंत गेला होता. आता ५००० रुपयांवर दर आहेत.
- अंकुश झंझाट, लिंबू बागायतदार, माऊली (चोर), अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com