लिंबू 'भाव' खातोय; पण शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच

उत्पादनात मोठी घट, खर्चही वाढला
lemon
lemonAgrowon
Published on
Updated on

पुणे : देशातील प्रमुख बाजारेपठांमध्ये लिंबाचा भाव २०० रुपये (The price of lemon in the major markets of the country is 200 rupees) किलोवर पोहोचला आहे. म्हणजे जवळपास आठ रुपयांना एक लिंबू. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी (Lemon Productive farmer) मालामाल झाले असतील असे कोणालाही वाटू शकते. पण तसे अजिबात नाही. लिंबाचे दर भडकलेत खरे पण शेतकरी मात्र तोट्यातच आहेत. कारण यंदा उत्पादनात निम्म्याहून जास्त घट झाली आहे. मजुरीचा खर्च वाढल्याने उत्पादनखर्चही (cost of production) वाढला. म्हणूनच गेल्या वर्षीपेक्षा लिंबाचे दर दुप्पट होऊनही गेला हंगामच चांगला होता, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

lemon
श्रीगोंद्यात व्यापाऱ्यांनी पाडले लिंबाचे दर

यंदा उन्हाचा (Summer) चटका वाढला तशी लिंबाला मागणीही वाढली. दरवर्षी उन्हाळ्याचा बाजार डोळ्यासमोर ठेऊन शेतकरी नियोजन करत असतात. उन्हाळ्यात लिंबाला (Summer Lemon) बऱ्यापैकी दर मिळतो. त्यामुळे या काळात उत्पादन घेण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्याही जास्त असते. वर्षभराचा विचार करता या चार महिन्यांत बाजारातली आवकही जास्त असते. यंदा मात्र चित्र उलट आहे. यंदा कडक उन्हाळा आणि रमजानचा महिना यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली. मात्र उत्पादन घटल्यामुळे बाजारात लिंबाचा (Market Lemon) तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लिंबाला विक्रमी दर मिळत आहे.
महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांत लिंबाचे दर वाढले आहेत. गुजरातमध्ये लिंबाला १८० ते २०० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. तर महाराष्ट्रात १२० ते २०० रुपयाने व्यवहार होत आहेत. उत्तर प्रदेशात तर दराने २२० रुपयाची पातळी गाठली. देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये लिंबाची आवक ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. लिंबाचा कमी पुरवठा आणि जास्त मागणी यामुळे दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

माझ्याकडे लिंबाची ४०० झाडे आहेत. मात्र फळ लागण्याच्या काळात धुक्यामुळे फळे गळून पडली. त्यामुळे उत्पादन घटलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत मला केवळ ३० टक्केच उत्पादन मिळालं. सध्या २०० रुपयांपर्यंत दर आहे. मात्र उत्पादन कमी असल्यामुळे खर्चाची तरी जुळणी होते की नाही, याची चिंता आहे.

- गोरख आळेकर, लिंबु उत्पादक, श्रीगोंदा, जि. नगर

गेल्या वर्षी ११ एप्रिलपर्यंत ७५० कट्टे लिंबू मिळाले होते. मात्र यंदा केवळ १२० कट्टे हाती लागले. यंदा दर दुप्पट झाला. पण त्याचा काय उपयोग? माझ्याकडे ५१५ लिंबाचे झाडे आहेत. रोज ५० ते ६० कट्टे बाजारात जायचे. पण यंदा केवळ ५ ते १० टक्के उत्पादन मिळालंय. त्यामुळे या दरवाढीचा काही फायदा नाही. उलट गेल्या वर्षीचा हंगाम बरा होता.

संतोष टाले, लिंबु उत्पादक, माझोड, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com