
खाद्यतेल (Edible Oil) हा भारताच्या खाद्यजीवनाचा मुख्य आधार. पेट्रोल (Petrol) आणि पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमतीचा भडका उडालेला असताना, खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ झाली की लोकांसोबतच व सरकारची चिंता वाढते. आता तर आयातही घटली आहे मात्र पामतेलाचे (palm oil) दर जैसे थे चं आहेत.
मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये खाद्यतेलाच्या आयातीत 6.37 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र तेल वर्षाच्या सुरुवातीच्या आठ महिन्यापासून ते ऑक्टोबरपर्यंत पाम तेलाची एकूण आयात 0.44 टक्क्यांनी किरकोळ वाढली आहे.
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEA) ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या जून महिन्यात भारताकडून 9.41 लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती.
तर मे मध्ये हीच आयात 10.05 लाख टन झाली. तेल वर्ष 2021-22 च्या पहिल्या आठ महिन्यांत खाद्यतेलाची आयात 84.90 लाख टनापर्यंत वाढली आहे. हेच 2020 - 21 मध्ये ही आयात 84.52 लाख टन एवढी होती.
भारत हा जगातील खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. यामध्ये पामतेलाचा हिस्सा 60 टक्के इतका आहे.
पाम तेल
भारतात पाम तेलाची आयात (Palm Oil Import) वाढली आहे. जूनमध्ये ही आयात 5.90 लाख टन होती. तेच मे मध्ये ही आयात 5.14 लाख टन इतकी होती. म्हणजे आयतीत 14.96 टक्के वाढ नोंदवली गेली. पण दुसरीकडे, तेल वर्ष 2021-22 च्या पहिल्या आठ महिन्यांत पाम तेलाची एकूण आयात 15.89 टक्क्यांनी कमी होऊन ही आयात 43.30 लाख टन इतकी करावी लागली.
आरबीडी पामोलिन आणि क्रूड पाम तेल (CPO) ची आयात तेल वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत अनुक्रमे 11 लाख टन आणि 3.17 लाख टन इतकी होती. एका वर्षापूर्वी ही आयात अनुक्रमे 29,376 आणि 5.01 लाख टन इतकी होती.
इंडोनेशिया आणि मलेशिया हे भारताचे पामतेलाचे प्रमुख पुरवठादार देश आहेत. चालू आर्थिक वर्षात मलेशियाने भारताला 19.99 लाख टन सीपीओ तर 3.44 लाख टन आरबीडी पाम तेलाचा पुरवठा केला. इंडोनेशियाने मागच्या आठ महिन्यात भारताला 6.43 लाख टन सीपीओ आणि 7.47 लाख टन आरबीडी पाम तेलाची निर्यात केली.
पामतेल क्षेत्रातील अलीकडच्या घडामोडींवर प्रकाश टाकताना मेहता म्हणाले की, 28 एप्रिल रोजी इंडोनेशिया सरकारने पामतेलाच्या निर्यातीवर निर्बंध लादले. त्याचा परिणाम इंडोनेशियन पाम तेलाची निर्यात 10 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली. यामुळे त्या देशात खूप जास्त साठा होता.
बाजारातील घडामोडींचा हवाला देत मेहता पुढे सांगतात की, इंडोनेशियामध्ये आज पामतेलाचा 8.5 दशलक्ष टन एवढा साठा आहे. 23 मे रोजी इंडोनेशियाला निर्यात बंदी उठवण्यास भाग पाडण्यात आलं जेणेकरून जास्तीचा तेलसाठा कमी होईल.
निर्यात कर आणि आकारणी देखील प्रति टन 575 डॉलरवरून 488 डॉलर प्रति टन करण्यात आली. आता निर्यातीला चालना मिळावी म्हणून हा कर आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे.
आता इंडोनेशियातील निर्यातीत वाढ झाली असून त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेतील किंमतींवरही होताना दिसून येतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किंमतीत गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून येतंय.
पाम तेलाची CIF किंमत मे महिन्यात 1,769 डॉलर प्रति टन इतकी होती. तीच किंमत आता जूनमध्ये 1,519 डॉलर प्रति टन इतकी कमी झाली आहे.
दरम्यान, सोयाबीन तेलाची आयात मे महिन्यात 3.73 लाख टन इतकी होती. ती आता जूनमध्ये 2.30 लाख टनावर आली आहे. सूर्यफूल तेलाची आयात मे महिन्यात 1.18 लाख टन इतकी होती. त्यात किरकोळ वाढ होऊन ही आयात जूनमध्ये 1.19 लाख टन झाली आहे.
2021-22 च्या पहिल्या आठ महिन्यांत सोयाबीन तेलाची एकूण आयात 28.10 लाख टन करण्यात आली. हीच आयात 2020-21 मध्ये 18.50 लाख टन इतकी होती. म्हणजे आयतीत वाढ झाली.
सुर्यफुल तेलाच्या बाबतीत ही आयात घटल्याचं दिसतं. वर्ष 2021-22 च्या पहिल्या आठ महिन्यांत सूर्यफूल तेलाची एकूण आयात 13.48 लाख टन इतकी होती. ती आयात 2020-21 च्या याच कालावधीत 14.52 लाख टन एवढी होती.
कच्च्या सोयाबीन तेलाची CIF किंमत मे महिन्यात 1,889 डॉलर प्रति टन होती. तीच किंमत जूनमध्ये 1,686 डॉलर प्रति टन झाली. त्यामुळे कच्च्या सूर्यफूल तेलाची किंमत मे महिन्यात 2134 डॉलर प्रति टनच्या तुलनेत घसरून जूनमध्ये 1,941 डॉलर प्रति टन इतकी झाली.
भारताने अर्जेंटिनातून 17.24 लाख टन सोयाबीन तेल, 7.20 लाख लीटर टन ब्राझील आणि 1.69 लाख लीटर टन तेल अमेरिकेतून आयात केले. मार्चपूर्वी युक्रेनमधून 8.42 लाख टन कच्चे सूर्यफूल तेल आयात केले होते. त्यानंतर रशियाकडून 3.01 लाख टन तर अर्जेंटिनाकडून 1.80 लाख टन तेल आयात करण्यात आलं.
मेहता म्हणाले की, भारत सरकारने सोयाबीन क्रूड तेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर टॅरिफ रेट कोटा (TRQ) वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि शून्य आयात शुल्कावर TRQ साठी परवाने जारी केले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.