Soya Oil Import : जुलैमध्ये सोयातेलाची विक्रमी आयात

Edible Oil Market : भारत हा पाम तेलाचा जगातील सर्वांत मोठा आयातदार देश आहे. भारताने आयात कमी केल्यामुळे इंडोनेशिया आणि मलेशियात पाम तेलाचे साठे वाढले. याचा परिणाम पाम तेलाच्या दरावरही दिसून येत आहे.
Edible Oil
Edible Oil Agrowon
Published on
Updated on

Pune News : भारताची पामतेल व सूर्यफूल आयात जुलै महिन्यात कमी झाली; तर सोयातेलाची आयात मात्र तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेली. यापुढे सणासुदीचा काळ असल्यामुळे खाद्यतेलाची मागणी वाढण्याचा अंदाज आहे, असे आयातदारांनी सांगितले.

मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात वाढ झाली. त्यातही पाम तेलाच्या दराला चांगला आधार मिळाला होता. त्यामुळे भारताची पाम तेल आयात जुलै महिन्यात १० टक्क्यांनी कमी होऊन ८ लाख ५८ हजार टनांवर स्थिरावली. ही गेल्या ११ महिन्यांतील निचांकी पातळी ठरली. पाम तेलाचे भाव वाढल्याने प्रक्रिया उद्योगात राइस ब्रान तेलाचा वापर केला जात होता.

Edible Oil
Edible Oil Hording : खाद्यतेलाची साठेबाजी रोखण्यासाठी आणणार नवा कायदा

भारत हा पाम तेलाचा जगातील सर्वांत मोठा आयातदार देश आहे. भारताने आयात कमी केल्यामुळे इंडोनेशिया आणि मलेशियात पाम तेलाचे साठे वाढले. याचा परिणाम पाम तेलाच्या दरावरही दिसून येत आहे.

सोयातेलाचे भाव इतर तेलांच्या तुलनेत कमी राहीले. त्यामुळे जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात सोयातेलाची आयात तब्बल ३८ टक्क्यांनी वाढली. जवळपास पाच लाख टन सोयातेल आयात झाले. एका महिन्यातील आयातीचा हा गेल्या तीन वर्षांतील उच्चांक आहे. सोयातेलाची आयात वाढल्याने गुजरातमधील कांडला बंदरांवर व्हेसल्सची गर्दी झाली होती.

सूर्यफूल तेलाची आयात जुलै महिन्यात सात टक्क्यांनी कमी होऊन दोन लाख टनांवर स्थिरावली. पाम तेल आणि आणि सूर्यफूल तेलाची आयात घटली असली तरी सोयातेल आयातीचे प्रमाण वाढल्याने जुलैमध्ये देशाची एकूण खाद्यतेल आयात आधीच्या महिन्याच्या तुलनेत १.५ टक्का वाढली. आयात १५ लाख ३ हजार टनांवर पोहोचली. नोव्हेंबर २०२४ पासूनची ही सर्वाधिक आयात ठरली.

Edible Oil
Natural Edible Oil : खाद्यतेलाचा यशस्वी स्वानंद शतायू ब्रॅण्ड

आयात वाढीसाठी प्रयत्न

देशात चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यांमध्ये खाद्यतेल आयात सरासरीपेक्षा जळपास १ लाख टनाने कमी झाली. आता यापुढील काळ सणासुदीचा आहे. त्या वेळी खाद्यतेलाला चांगली मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार खाद्यतेल आयात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. सणांमध्ये पाम तेलाला जास्त मागणी असते. मिठाई आणि तळलेले पदार्थ तयार करण्यासाठी पाम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता पाम तेलाचे भाव कमी झाल्याने त्याची आयात वाढू शकते, असे आयातदारांनी सांगितले.

जैवइंधनामुळे दराला आधार

जागतिक बाजारात जैवइंधनासाठी खाद्यतेलाचा वापर वाढल्यामुळे दराला आधार मिळत आहे. जागतिक पातळीवर एकूण वार्षिक खाद्यतेल उत्पादनापैकी २१ टक्के उत्पादन जैवइंधनासाठी जाते. इंडोनेशियाने जैवइंधनात पाम तेलाचा वापर वाढवला. त्यामुळे पाम तेलाचे भाव वाढले होते. तसेच अमेरिका, ब्राझीलही जैवइंधनासाठी खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com