Pomegranate Export : समुद्री वाहतुकीद्वारे महाराष्ट्राचे डाळिंब अमेरिकेच्या बाजारपेठेत

Pomegranate Market : अमेरिकेत समुद्री वाहतुकीमार्गे प्रायोगिक निर्यातीच्या पहिल्या प्रयत्नात डाळिंब संशोधन केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने साठवणूक क्षमता ६० दिवसांपर्यंत वाढवण्यासंबंधी स्थिर चाचण्या घेण्यात आल्या.
Pomegranate Export
Pomegranate ExportAgrowon
Published on
Updated on

Nashik News : वाणिज्य मंत्रालयाच्या ‘कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणा’च्या (अपेडा) माध्यमातून यापूर्वी अमेरिकेत हवाई व समुद्री मार्गाने प्रायोगिक निर्यात चाचणी झाली होती. तर फेब्रुवारी-२०२५ मध्ये तांत्रिक व व्यवहार्य बाजू अभ्यासून महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाच्या भगव्या वाणाची समुद्री वाहतुकीद्वारे अमेरिकेच्या बाजारपेठेत यशस्वी निर्यात करण्यात आली आहे.

यापूर्वी झालेली हवाईमार्गे निर्यात खर्चिक होती, आता समुद्री वाहतुकीद्वारे खर्च निम्म्यावर आला आहे. लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक निर्यातीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. औषधी गुणधर्म व पोषण मूल्यांमुळे डाळिंब फळांची विशेष मागणी असते. देशात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेशमध्ये लागवडी आहेत.

Pomegranate Export
Pomegranate Farming: वाढत्या तापमानात डाळिंबाची दर्जा राखण्यासाठी प्रयत्न

प्रमुख निर्यात होणाऱ्या देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती (यूएई), बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहरीन, ओमान यांसह अमेरिकेचा समावेश आहे. मात्र २०१८ मध्ये अमेरिकेत सुरू असलेली निर्यात तांत्रिक कारणांमुळे ५ वर्षे ठप्प झाली. त्यामुळे निर्यात पूर्ववत करण्यासाठी ‘अपेडा’ व कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्थायांनी संयुक्तरीत्या अमेरिकेच्या कृषी विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर २०२२ मध्ये निकष व निर्यात पद्धती निश्‍चित होऊन पुन्हा निर्यात सुरू होण्यास हिरवा झेंडा मिळाला.

‘अपेडा’, ‘युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चर’, ‘अ‍ॅनिमल ॲण्ड प्लांट हेल्थ इन्स्पेक्शन सर्व्हिस’, ‘राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था’ आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (सोलापूर) यांचे संयुक्त कामकाज तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील किरणोत्सर्ग सुविधा केंद्रावर प्रक्रिया करून जुलै-२०२३ मध्ये हवाई मार्गाने निर्यात चाचणी घेण्यात आली. अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने माईट वॉश, सोडिअम हायपोक्लोराइड प्रक्रिया, वॉशिंग ड्राईंग आदी प्रक्रिया बंधनकारक केल्या होत्या.

Pomegranate Export
Pomegranate Export: अहिल्यानगर जिल्ह्यातून यंदा डाळिंब निर्यात वाधन्याचा अंदाज

पाच आठवड्यांच्या आत डाळिंब अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर

अमेरिकेत समुद्री वाहतुकीमार्गे प्रायोगिक निर्यातीच्या पहिल्या प्रयत्नात डाळिंब संशोधन केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने साठवणूक क्षमता ६० दिवसांपर्यंत वाढवण्यासंबंधी स्थिर चाचण्या घेण्यात आल्या. या वेळी प्रायोगिक तत्त्वावर ४,२०० पेट्यांमधून १२.६ टन डाळिंब गेला होता. तर अलीकडेच फेब्रुवारी-२०२५ मध्ये पुन्हा ‘अपेडा’ नोंदणीकृत शेतीमाल निर्यातदार केबी एक्स्पोर्ट यांच्या माध्यमातून जेएनपीटी बंदरावरून निर्यात यशस्वी झाली.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुमारे १४ टन वजनाच्या ४,६२० पेट्यांची शिपमेंट ५ आठवड्याच्या आत अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली. न्यू यॉर्कमध्ये माल पोहोचल्यानंतर ‘गुणवत्ता’ असल्याचे नोंदविण्यात आले. आकर्षक व चवीमुळे भगवा वाण ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. पणनमंत्री जयकुमार रावल, ‘अपेडा’च्या सरव्यवस्थापक विनीता सुधांशू, अपेडा मुंबई कार्यालयाचे प्रशांत वाघमारे, पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, मुंबई फायटो सॅनिटरी विभागाचे प्रमुख ब्रजेश मिश्रा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

‘अपेडा’ने प्री-क्लिअरन्स प्रोग्रामला निधी देऊन आंबा आणि डाळिंब यासारख्या भारतीय फळांच्या अमेरिकेतील निर्यातीला पाठिंबा दिला आहे. प्रीमियम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फळे निर्यात झाल्यानंतर भारतीय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल.
- अभिषेक देव, अध्यक्ष-अपेडा
अमेरिकन ग्राहकांकडून गुणवत्तापूर्ण फळांची मागणी आहे. नोव्हेंबर-२०२४ पासून डाळिंब निर्यातसंदर्भात कामकाज सुरू केले. हवाई वाहतुकीमार्गे सुरुवात केली; मात्र त्यात वाहतूक खर्च अधिक होता, त्यामुळे मागणी कमी होती. आता समुद्री वाहतुकीचे निकष निश्‍चित करून डाळिंब पाठवला आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च निम्म्यावर आल्याचे समोर आले. त्यामुळे आगामी काळात कमी वाहतूक खर्च व गुणवत्तेमुळे मागणी वाढणार आहे.
- कौशल खखर, मुख्य कार्यकारी अधिकारी, केबी एक्स्पोर्टस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com