Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

Agriculture Trade Policy India : अमेरिकेसमवेतच्या प्रस्तावित व्यापार करारावरून होणाऱ्या टीकेला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी (ता. ५) प्रत्युत्तर दिले.
Piyush Goyal
Piyush GoyalAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : अमेरिकेसमवेतच्या प्रस्तावित व्यापार करारावरून होणाऱ्या टीकेला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी (ता. ५) प्रत्युत्तर दिले. अमेरिकेसमवेतच्या व्यापार कराराच्या अनुषंगाने भारत कोणत्याही प्रकारचा दबाव मान्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

हा करार करताना देशहितास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल, असे ते म्हणाले. ‘भारत कोणत्याही मुदतीअंतर्गत वाटाघाटी करीत नाही. देशाचे हित डोळ्यांसमोर ठेवून आम्ही वाटाघाटी करीत आहोत. आमच्या जगभरातील चर्चांमध्ये राष्ट्रीय हित सर्वोच्च आहे,’ असे पीयूष गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अमेरिकेसमवेतच्या प्रस्तावित आयात शुल्क करारावरून भारत अंतिम मुदतीच्या दबावाखाली नाही. राष्ट्रहित हे अंतिम मुदतीपेक्षाही मोठे आहे. देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल. ‘मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही मॉरिशस, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिंचेस्टाइन या चार देशांच्या ‘ईएफटीए’ गटासमवेत मुक्त व्यापार करार केले. याशिवाय गेल्या महिन्यात ब्रिटनसमवेत करार केला,’ असे गोयल यांनी सांगितले.

भारत आज अतिशय मजबूत भूमिकेतून वाटाघाटी करीत आहे. या बाबतीत आम्हाला आत्मविश्‍वास आहे आणि जगातील कोणाशीही आम्ही स्पर्धा करू शकतो. हा यूपीएच्या काळातील कमकुवत भारत नाही, असे प्रत्युत्तर गोयल यांनी दिले.

Piyush Goyal
India US Trade: कृषी उत्पादनांबाबत कोणतीही तडजोड नाही

‘मोदी पुन्हा ट्रम्पसमोर झुकतील’

अमेरिकेसमवेतच्या आयातशुल्क कराराच्या अंतिम मुदतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे सहज झुकतील, असा दावा काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी (ता. ५) केला. ‘भारत अमेरिकेसमवेतचा प्रस्तावित आयात शुल्क करार पूर्णपणे अंतिम झाल्यावर आणि राष्ट्रहित केंद्रस्थानी ठेवूनच स्वीकारेल’, असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल शुक्रवारी म्हटले होते.

त्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी हे वक्तव्य केले. ट्रम्प यांनी भारतासमवेतच्या आयात शुल्क कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी ९ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. यावर मत व्यक्त करताना, ‘माझे शब्द लक्षात ठेवा, पीयूष गोयल यांनी कितीही छाती बडवली, तरी ट्रम्प यांनी आयात शुल्क करारासाठी निर्धारित केलेल्या अंतिम मुदतीपुठे मोदी गुपचूप झुकतील,’ असे भाकित राहुल गांधी यांनी वर्तवले आहे.

Piyush Goyal
US-India Trade : अमेरिका भारतावर कुरघोडी करणार का?

१२ देशांना पाठविणार आयात शुल्काची पत्रे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काच्या पत्रांवर स्वाक्षरी केली असून, १२ देशांना सोमवारी (ता. ७) ही पत्रे पाठवली जाणार आहेत. एअर फोर्स वन या विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी ही माहिती दिली. ज्या देशांना ही पत्रे पाठवली जाणार आहेत, त्यांची नावे सोमवारीच जाहीर केली जातील, असेही त्यांनी सांगितले. विविध देशांसाठी वेगवेगळ्या आयात शुल्कांचा यात समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जशास तसे पद्धतीचे आयात शुल्क काही देशांना लावले जाणार असून, ते ७० टक्क्यांपर्यंतही असू शकते. याची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून होणार असल्याचे संकेतही ट्रम्प यांनी दिले. अमेरिकेने ब्रिटन आणि व्हिएतनाम या देशांसमवेत व्यापार करार केले आहेत. अमेरिकेशी व्यापार करार करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ अमेरिकेला गेले होते. मात्र कोणत्याही अंतिम निर्णयाविना वाटाघाटींसाठीचे प्रमुख राजेश अग्रवाल भारतात परतले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com