Agriculture Commodity Market : मूग, मक्याची वाढती आवक

Market Update : २८ जून रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार या लेखातून पाहुयात.
Commodity Market
Commodity Market Agrowon

फ्यूचर्स किमती : सप्ताह २२ ते २८ जून २०२४

Agriculture Future Price : NCDEX मध्ये २६ जूनपासून मक्यासाठी २० ऑगस्ट २० सप्टेंबर व १८ ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू झाले. यासाठी मुख्य डिलिव्हरी केंद्र गुलाबबाग असेल. अधिकची केंद्रे छिंदवाडा, निजामाबाद व सांगली असतील. त्यांच्यासाठी प्रति क्विंटल अनुक्रमे रु. ५०, रु. ८० व रु. १५० प्रीमिअम असेल. १ जुलैपासून याच एक्स्चेंजमध्ये २० नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू होईल. यासाठी मुख्य डिलिव्हरी केंद्र छिंदवाडा असेल. अधिकची केंद्रे निजामाबाद, गुलाबबाग व सांगली असतील. त्यांच्यासाठी अनुक्रमे रु. ८०, रु. १२० व रु. १५० प्रीमिअम असेल.

मुगाची आवक सुरू झाली आहे. या वर्षी ती गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे. २०२२ वर्षाची पातळी गाठेल अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशमधील आवक सर्वाधिक आहे (८२ टक्के). मक्याची आवक सुद्धा वाढती आहे. येथेसुद्धा उत्तर प्रदेशमधील आवक सर्वाधिक (६५ टक्के) आहे.

२८ जून रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

Commodity Market
Agriculture Commodity Market : मूग, सोयाबीन, टोमॅटोच्या आवकेत वाढ

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.६ टक्क्याने वाढून रु. ५६,३०० वर आले होते. या सप्ताहात ते ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ५८,१६० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव १.८ टक्क्याने वाढून रु. ५८,८०० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५५,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.४ टक्क्यांनी कमी आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात २.८ टक्क्यांनी वाढून रु. १,५१४ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे या वर्षासाठी हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात २.१ टक्क्यांनी वाढून रु. २,४०० वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती २ टक्क्यांनी वाढून रु. २,४१० वर आहेत. या वर्षासाठी हमीभाव रु. २,२२५ आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १८,०५४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.७ टक्क्याने घसरून रु. १७,७४२ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. १६,९२४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १७,८५४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.६ टक्क्याने जास्त आहेत.

Commodity Market
Agriculture Commodity Market : सोयाबीन, कापसाचे जागतिक उत्पादन वाढण्याचा अंदाज

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ६,७०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्याने वाढून रु. ६,७५० वर आल्या आहेत. चालू हंगामासाठी हमीभाव रु. ५,४४० जाहीर झाला आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,३२५ वर आलेली आहे. मुगाचा चालू हंगामासाठी हमीभाव रु. ८,६८२ आहे. आवक आता वाढू लागली आहे.

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,६४६ वर आली आहे. चालू वर्षासाठी सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,७७९ वर आली होती. या सप्ताहात ती ०.२ टक्क्याने घसरून रु. १०,७५८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. २,९०० होती; या सप्ताहात ती रु. ३,०५० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४,००० वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com