Agriculture Commodity Market : कापूस, मका, मूग, सोयाबीनच्या आवकेत वाढ
Agriculture Future Price :
फ्यूचर्स किमती : १९ ते २५ ऑक्टोबर २०२४
कापूस, मका, मूग व सोयाबीन यांची आवक या सप्ताहात सुद्धा वाढती आहे. तूर व कांदा वगळता या सप्ताहात सर्व वस्तूंचे भाव घसरले. मूग व सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. तुरीत घसरणीचा कल आहे. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.२ टक्क्याने घसरून रु. ५६,३०० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.२ टक्क्याने घसरून रु. ५६,२०० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव ०.२ टक्क्याने घसरून रु. ५६,३६० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव रु. ५७,९९० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.२ टक्क्यांनी अधिक आहेत. भविष्यात कापसाचे भाव कमी होतील असा अंदाज हे भाव दर्शवतात. कापसाची आवक वाढती आहे.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) सुद्धा या सप्ताहात १.३ टक्क्याने घसरून रु. १,५३६ वर आले आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स रु. १,५५४ वर आले आहेत तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,५५३ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.४ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. एप्रिल फ्यूचर्स या हमीभावापेक्षा प्रति क्विंटल रु. २४४ ने अधिक आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात २ टक्क्यांनी घसरून रु. २,४०० वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती २.१ टक्क्यांनी घसरून रु. २,४१३ वर आल्या आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. २,४४१ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.७ टक्क्याने अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.
हळद
NCDEX मध्ये या महिन्यात हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलीवरी व्यवहार सुरू आहेत. NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात २.४ टक्क्यानी घसरून रु. १३,८१९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यानी घसरून रु. १३,७७५ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती ३.३ टक्क्यानी घसरून रु. १३,२५६ वर आल्या आहेत. एप्रिल किमती रु. १३,७८८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या केवळ ०.१ टक्क्याने अधिक आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात २.७ टक्क्यांनी घसरून रु. ७,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ४.२ टक्क्यांनी घसरून रु. ६,९०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) ०.९ टक्क्याने घसरून रु. ७,८५० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. किमती कमी होत आहेत.
सोयाबीन
या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४,६४६ वर स्थिर आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ८,७०८ वर आली होती. या सप्ताहात ती १.६ टक्क्याने वाढून रु. ८,८४९ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. नवीन पिकाची आवक जानेवारी अखेर सुरू होईल.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. ४,२१७ होती; या सप्ताहात ती रु. ४,४६७ वर आली आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४,००० वर आली होती. या सप्ताहात ती घसरून रु. ३,७०० वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची
किंमत प्रति २० किलो.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.