Broiler Chicken Productivity : ब्रॉयलर चिकनच्या उत्पादकता खर्चात वाढ

Market Update : एक दिवसांचे पिल्लू त्यासह मका आणि तयार खाद्याच्या दरात झालेल्या वाढीच्या परिणामी ब्रॉयलर चिकनचा उत्पादकता खर्चही वाढला आहे.
Broiler Chicken
Broiler ChickenAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : एक दिवसांचे पिल्लू त्यासह मका आणि तयार खाद्याच्या दरात झालेल्या वाढीच्या परिणामी ब्रॉयलर चिकनचा उत्पादकता खर्चही वाढला आहे. सध्या ९० ते ९२ रुपये असा प्रतिकिलो उत्पादकता खर्च असून जिवंत पक्षी प्रतिकिलो ९५ रुपयांनी विकला जात आहे. त्याचवेळी चिकनचा किरकोळ विक्री दर २६० ते २८० रुपयांवर पोचला आहे.

पोल्ट्री व्यावसायिक शुभम महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रॉयलर चिकनच्या उत्पादकता खर्च वाढीत अनेक घटक कारणीभूत ठरतात. एक दिवसाच्या पिल्लांचा दर १७ रुपये होता. त्यातही वाढ होत याचे दर ३० रुपयांवर पोचले आहेत. अवघ्या वीस दिवसांत ही वाढ नोंदविण्यात आली आहे. मका दीड महिन्यात २२ रुपयांवरून २८ रुपये (२८०० रुपये क्‍विंटल) किलोवर गेला आहे.

Broiler Chicken
Broiler Poultry Business : सातत्य, चिकाटीतून ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय केला यशस्वी

मका दरात सातत्याने होणाऱ्या वाढीचा देखील ब्रॉयलरच्या उत्पादकता खर्चावर परिणाम होत आहे. मका दरात वाढ झाल्याने बाजारात तयार पशुखाद्य ४२ रुपये किलोवर पोचले आहे. यापूर्वी याचे दर ३६ ते २७ रुपये किलो होते. परिणामी ब्रॉयलरचा उत्पादन खर्च ९० ते ९२ रुपयांवर गेला आहे. त्याचवेळी बाजारात जिवंत ब्रॉयलर पक्षी ९५ रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे.

तेलंगणा राज्य पोल्ट्री व्यवसायाचे हब म्हणून ओळखले जाते. या भागात ब्रॉयलरची उपलब्धता अधिक असल्याने या ठिकाणी जिवंत पक्ष्याचे प्रतिकिलो दर ८५ रुपयांवर आहेत. त्या भागातून देखील महाराष्ट्रात आवक होते. त्याचाही दरात परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे

Broiler Chicken
Broiler Chicks Brooding : ब्रॉयलर पिलांचे ब्रूडिंग अन् व्यवस्थापन

आयातीची मागणी

पोल्ट्री फिडमध्ये मक्‍याचा वापर होतो. मात्र मका दरात सातत्याने वाढ होत असल्याने शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीसह अनेक संघटनांनी मका तुटवड्याच्या पार्श्‍वभूमीवर मका आयात करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

त्याकरिता मक्‍यावरील आयात शुल्क माफ करावे किंवा ते १५ टक्‍के करावे, अशी देखील मागणी आहे. भारताची मका उत्पादकता ३८० लाख टन आहे. परंतु देशांतर्गत गरज भागविण्यात ही उत्पादकता प्रभावी ठरत नाही. विशेष म्हणजे एकूण उत्पादकतेच्या ६० ते ६५ टक्‍के मक्‍याचा वापर हा पोल्ट्री फिडमध्ये होतो.

एक दिवसाच्या पिल्लाचा दर ३० रुपये आहे. पूर्वी तो १७ रुपये होता. त्यापूर्वी पिल्लाचे दर ५० रुपयांवर पोचले होते. मका दरातही तेजी आहे. या साऱ्यामुळे उत्पादकता खर्च ९० ते ९२ रुपये आहे. हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्याची सुरवात सोमवार (ता.२२) पासून होत आहे. त्यामुळे त्याचाही बाजारपेठेवर परिणाम होईल, अशी भीती आहे.
शुभम महाले, संचालक, अमरावती पोल्ट्री असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com