Commodity Market : मका, हळद, तूर, हरभरा यांच्या किमतींत वाढ

Turmeric Market Update : हळदीच्या किमतीतील तेजी याही सप्ताहात कायम राहिली आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे.
Commodity Market
Commodity Market Agrowon

फ्यूचर्स किमती ः सप्ताह २९ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३

१ ऑगस्टपासून NCDEX मध्ये मक्यासाठी डिसेंबर डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले. सध्या NCDEX मध्ये मक्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी व हळदीसाठी ऑक्टोबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी व्यवहार करता येतील. MCX मध्ये कापसासाठी नोव्हेंबर व जानेवारी डिलिव्हरीसाठी आणि कपाशीसाठी नोव्हेंबर, फेब्रुवारी व एप्रिल डिलिव्हरीसाठी व्यवहार चालू आहेत.

हळदीच्या किमतीतील तेजी याही सप्ताहात कायम राहिली आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकणे अजूनही किफायतशीर आहे. हेजिंगसाठी संधी आहे.

मका, हळद, तूर, हरभरा, कांदा व टोमॅटो यांच्या किमती वाढत आहेत. कापसाचे भाव १४ जुलैपर्यंत घसरत होते; आता ते वाढत आहेत. मुगाच्या किमती मात्र मे महिन्यापासून घसरत आहेत. सोयाबीनच्या किमती रु. ५,२०० ते रु. ५,३०० दरम्यान आहेत. हळदीच्या स्पॉट किमती रु. १४,२०० च्या वर, तर टोमॅटोच्या किमती रु. ८,५०० च्या वर गेल्या आहेत.

SEBI ने २१ जुलैपासून हळदीवरील मार्जिन २ टक्क्यांनी वाढवले आहे. पण त्याचा परिणाम या सप्ताहातील किमतीवर दिसला नाही. हळदीच्या भावात १०.३ टक्क्यांनी वाढ झाली. या सप्ताहात सर्वच पिकांच्या स्पॉट किमती वाढल्या; फक्त मक्याच्या किमती स्थिर राहिल्या.

Commodity Market
Tur Import : केंद्र सरकारला तुरीसाठी ‘मोझंबिक’ चे डोहाळे का लागले?

४ ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात १.९ टक्क्याने वाढून रु. ५८,१६० वर आले होते. या सप्ताहात ते १.४ टक्क्याने वाढून रु. ५८,९४० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५९,५६० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. ५८,५०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ०.८ टक्क्याने कमी आहेत. कापसाचे भाव वाढण्याचा कल आहे. आवक कमी होत आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,४२७ वर आले होते. या सप्ताहात ते २.८ टक्क्यांनी वाढून रु. १,५२५ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५७० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५५० वर आहेत.

ते स्पॉट भावापेक्षा ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. कपाशीचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत. थोडे अधिक थांबून हेजिंगसाठी विचार करावा.

Commodity Market
Maize Pest : खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळी

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात १ टक्का वाढून रु. २,१०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या याच पातळीवर स्थिर आहेत. फ्यूचर्स (सप्टेंबर डिलिव्हरी) किमती रु. २,१२० वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती रु. २,१४५ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.१ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याचे भाव असेच वाढत राहिले, तर योग्य भाव बघून हेजिंग करण्याचा विचार करावा.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात ८.६ टक्क्यांनी वाढून रु. १२,९०४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १०.३ टक्क्यांनी वाढून रु. १४,२३४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमतीसुद्धा ३.८ टक्क्यांनी वाढून रु. १६,३१२ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १६,००६ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या २०.६ टक्क्यांनी जास्त आहेत. ही वाढ निश्‍चित सट्टेबाजीमुळे निर्माण झालेली आहे; मात्र फ्यूचर्स विक्रीसाठी त्याचा फायदा करून घेत येईल.

Commodity Market
Chana Market : विदर्भातील बाजारांत हरभरा दर पाच हजारांवर

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात १ टक्क्याने वाढून रु. ५,३०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २.४ टक्क्यांनी वाढून रु. ५,४२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. गेल्या तीन महिन्यांत हरभऱ्याचे भाव वाढत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) गेल्या सप्ताहात १.६ टक्क्याने घसरून रु. ७,६०० वर आली होती. या सप्ताहात ती १.३ टक्क्याने वाढून रु. ७,७०० वर आली आहे. मुगाची आवक गेल्या काही सप्ताहांत वाढत होती; आता ती घसरू लागली आहे. गेल्या हंगामापेक्षा या वर्षी ती कमी झाली आहे. मुगाचा चालू हंगामासाठी हमी भाव रु. ८,५५८ जाहीर झाला आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ५,१५१ वर आली होती. या सप्ताहात ती १ टक्क्याने वाढून रु. ५,२०२ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ०.८ टक्क्याने घसरून रु. ९,३४१ वर आली होती. या सप्ताहात ती १.३ टक्क्याने वाढून रु. ९,४६७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीच्या भावात अजूनही तेजी आहे. आवक कमी आहे; पुढील वर्षाचे उत्पादन अनिश्‍चित आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com