Chana Market : विदर्भातील बाजारांत हरभरा दर पाच हजारांवर

Chana Market Rate : विदर्भातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर पाच हजार रुपयांच्या खाली होते. आता मात्र हरभऱ्याने पाच हजार रुपयांचा टप्पा गाठला असून त्याच्या परिणामी बाजारात आवकही वाढीस लागली आहे.
Chana
ChanaAgrowon

Nagpur News : विदर्भातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर पाच हजार रुपयांच्या खाली होते. आता मात्र हरभऱ्याने पाच हजार रुपयांचा टप्पा गाठला असून त्याच्या परिणामी बाजारात आवकही वाढीस लागली आहे. कळमना बाजारात गेल्या पंधरवाड्यापासून हरभरा आवक अवघी २०० क्‍विंटल असताना दरवाढीनंतर ती वाढून ३५२ क्‍विंटलवर पोहोचली आहे.

सोयाबीन, तूर, हरभरा ही विदर्भाची मुख्य पिके समजली जातात. नागपूरच्या कळमना बाजार समितीत हरभऱ्याचे दर गेल्या महिनाभरापासून दबावात होते. सरासरी ४४०० ते ४८३६ या दराने हरभऱ्याचे व्यवहार होते. तूर दरात सुधारणा झाली असताना हरभऱ्यात दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यानुसार हरभरा दरात काहीशी सुधारणा गेल्या काही दिवसांत अनुभवली जात आहे.

Chana
Chana Procurement : हमीभावाने २ लाख ७० हजार क्विंटलवर हरभरा खरेदी

४७०० ते ४८२८ याप्रमाणे हरभरा दर होते. आवक १२१, १५४ क्‍विंटल अशी होती. आता आवक वाढण्यासोतच दरातही अल्पशी तेजी आली आहे. परिणामी हरभरा विक्रीसाठी थांबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. कळमना बाजार समितीत हरभऱ्याला सध्या ४८०० ते ५१८८ असा दर मिळत आहे.

Chana
Chana Market : देशात हरभऱ्याचे दर दबावात

कारंजा (जि. वाशीम) बाजार समितीतदेखील हरभरा दर तेजीत आहेत. ४९०५ ते ५११० रुपये याप्रमाणे हरभऱ्याचे व्यवहार होत असून आवक २९० क्‍विंटल नोंदविली गेली. शेगाव (जि. बुलडाणा) बाजार समितीत मात्र दर दबावातच असल्याची स्थिती आहे.

या ठिकाणी ४५०० ते ४७२५ असा दर हरभऱ्याला मिळाला. यवतमाळ बाजार समितीत ४६०० ते ५००० असा दर हरभऱ्याला मिळत आहे. यवतमाळमध्ये देखील याच आठवड्यात हरभरा दराने पाच हजार रुपयांचा टप्पा गाठल्याची माहिती बाजार समिती सूत्रांकडून देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com