Cotton Import : सरत्या हंगामात कापूस आयातीत वाढ

देशात रुई व सुताचा तुटवडा असल्याचा कांगावा करणाऱ्या वस्त्रोद्योगातील विविध संघटनांच्या दबावासमोर मागील हंगामात म्हणजेच २०२१-२२ मध्ये केंद्राने कापूस आयात शुल्क काही महिने रद्द केले.
Cotton Market
Cotton Market Agrowon
Published on
Updated on

जळगाव ः देशात रुई व सुताचा तुटवडा (Cotton Rate) असल्याचा कांगावा करणाऱ्या वस्त्रोद्योगातील (Textile Industry) विविध संघटनांच्या दबावासमोर मागील हंगामात म्हणजेच २०२१-२२ मध्ये केंद्राने कापूस आयात शुल्क (Cotton Import Duty) काही महिने रद्द केले. परिणामी, देशात मागील हंगामात कापूस आयात (Cotton Import) १० लाख गाठींनी (एक गाठ १७० किलो रुई) वाढली.

Cotton Market
Cotton Rate : भारतासह चीन, पाकिस्तानात कापसाचे भाव तेजीत

देशात यंदा कापूसगाठींचा साठा वाढेल, अशी स्थिती आहे. यात हा आयातीचा सपाटा कापूस उत्पादकांसाठी यंदा नुकसानकारक ठरला आहे. देशात कापूसटंचाईचे खोटे अहवाल यंदाही विविध संघटना सादर करीत आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियाकडून पिमा व गिझा प्रकारच्या (२८ मिलिमीटर लांब धागा व शुभ्रता) तीन लाख गाठींची आयात या वर्षात केंद्र करीत आहे.

विशेष म्हणजे आपल्या देशात सुविन, डीसीएचसारखे दर्जेदार किंवा लांब धागा, मजबुती, शुभ्रता यासाठी प्रसिद्ध असलेल्या कापसाचे मध्य प्रदेश, ओडिशा आदी भागात उत्पादन, निर्मिती केली जाते. तरीदेखील यंदा आयातीसंबंधी तातडीने केंद्राने पत्रक जारी केले.

देशात कापसाचा साठा वाढून ४० ते ५० लाख गाठींचा अखेरचा साठा (एंडिंग स्टॉक) राहू शकतो. यामुळे बाजारात कापूस दरांवर दबावही यंदा दिसत आहे.

कापूसगाठींच्या आयातीवरील ११ टक्के आयात शुल्क चार महिने रद्द केल्यामुळे गेल्या हंगामात देशातील कारखानदार व इतरांनी परदेशातून कापूस आयातीचा सपाटा लावला. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात सुमारे २० लाख गाठींची विक्रमी आयात झाली.

या कापसाचा वापर या हंगामात म्हणजेच ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाला. परिणामी, देशातील कापूस गाठींचा उठावही कमी राहिल्याचे जाणकार सांगतात. मागील हंगामात आयात वाढली नसती, तर किमान सुरुवातीला देशात कापसाची चांगली मागणी राहण्याची शक्यता होती.

Cotton Market
Cotton, Soybean Market : कापूस, सोयाबीनचे दर नरमले

देशात कापसाचा वापर ३०० ते ३०५ लाख गाठी असतो. यंदा वापर २९१ ते २९५ लाख गाठी राहील. कापसाचे उत्पादन ३३० ते ३३५ लाख गाठी राहू शकते. त्यात मागील हंगामातील आयात गाठींची भर राहणार आहे. कापसाची निर्यात यंदा होत नसल्याची स्थिती आहे.

भारतीय कापूस गाठींचा सर्वांत मोठा खरेदीदार बांगलादेशने ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या काळात सुमारे ४० लाख गाठींची आयात विविध देशांतून केली. भारताकडून बांगलादेश २७ ते ३० लाख गाठींची आयात करतो.

पण डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २२ या काळात जगभरातून केवळ २८ लाख गाठींची आयात केली. बांगलादेशने कमी केलेल्या आयातीचा फटका देशातील कापूसगाठींच्या व्यापारास यंदा अधिक बसला आहे.

देशातून यंदा कापूस निर्यात घटली आहे. यातच आयात मागील हंगामात किंवा सरत्या वेळेस अधिक झाली आहे. देशातील कापूस गाठींचा वापर यंदा कमी झाल्याने दरांबाबत समाधानकारक स्थिती नाही.

- महेश शारदा, माजी अध्यक्ष, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन

२०२०-२१ मधील कापूस आयातीबाबत माहिती

(आयात लाख गाठींमध्ये, एक गाठ १७० किलो रुई)

महिना कापूस आयात

ऑक्टोबर २०२० १.०४

नोव्हेंबर ०.८६

डिसेंबर १.१५

जानेवारी २०२१ १.७२

फेब्रुवारी १.०६

मार्च १.२१

एप्रिल १.०२

मे १.२४

जून १.६०

जुलै १.३७

ऑगस्ट १.०३

सप्टेंबर १.२४

..................

एकूण - १४.५३

२०२१-२२ मधील कापूस आयातीबाबत माहिती

महिना कापूस आयात

ऑक्टोबर २०२१ १.०९

नोव्हेंबर १.८०

डिसेंबर १.०७

जानेवारी २०२२ ०.८१

फेब्रुवारी ०.८१

मार्च १.०७

एप्रिल ०.९४

मे १.५९

जून २.१७

जुलै ३.२०

ऑगस्ट ५.१३

सप्टेंबर ५.६२

...........................

एकूण - २४.३०

(माहिती स्रोत - केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्रालय)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com