Cotton Arrival : बारामती बाजार समितीत कापसाच्या आवकेत वाढ

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत दर बुधवार आणि शनिवारी कापसाचे लिलाव सुरू झाले आहेत. शनिवारी (ता. ५) आवारात १०० क्विंटल कापसाची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७९०१ रुपये असा दर मिळाला.
Cotton Arrival Baramati
Cotton Arrival BaramatiAgrowon
Published on
Updated on

बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत (Baramati APMC) दर बुधवार आणि शनिवारी कापसाचे लिलाव (Cotton Trad) सुरू झाले आहेत. शनिवारी (ता. ५) आवारात १०० क्विंटल कापसाची आवक (Cotton Arrival) झाली. त्यास प्रतिक्विंटल ७९०१ रुपये असा दर (Cotton Rate) मिळाला. तर सरासरी ७८०० रुपयांचा दर मिळाला, अशी माहिती प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी दिली.

Cotton Arrival Baramati
Cotton Rate: बाजारात सरकीचे दर किती वाढले ?

टांकसाळे म्हणाले, ‘‘कापूस हे नगदी आणि हमखास उत्पन्न देणारे पीक आहे. त्यामुळे बारामती, फलटण तसेच नजीकच्या तालुक्यांत कापसाच्या लागवडीत वाढ होत आहे. कापसाची मागणी, पुरवठा आणि दराची सध्याची परिस्थिती लक्षात घेता भविष्यात शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे.

Cotton Arrival Baramati
Soybean-cotton farmers : बुलडाण्यात आज एल्गार मोर्चा

यासाठी बाजार आवारात शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विविध सुविधा पुरविण्याचा समितीचा मानस आहे. यापुढे बारामती बाजार समितीत कापूस मार्केट विकसित होण्यासाठी अडते, व्यापारी व बाजार समिती प्रयत्नशील राहील.’’

‘‘कापसाची उघड लिलावात विक्री तसेच अचूक वजनमाप आणि त्याच दिवशी पेमेंट असा बारामती बाजार समितीचा नावलौकिक आहे. त्यामुळे परस्पर व्यापाऱ्यांना कापूस विक्री करण्याऐवजी शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये कापूस विक्रीस आणावा,’’ असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले.

स्वच्छ व निवडून आणलेल्या चांगल्या कापसाला जादा दर मिळत आहे. त्यामुळे आवकेत वाढ होत आहे. यापुढे आवकेत वाढ झाल्यास बाहेरील बाजारपेठेतील खरेदीदार येणार आहेत.
अरविंद जगताप, सचिव, बारामती बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com