Soybean, Moong, Urad Market : हिंगोलीत सोयाबीन, मूग, उडदाला हमीभावापेक्षा कमी दर

Soybean, Mug, Urad Rate : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) गुरुवारी (ता. १०) सोयाबीन, मूग, उडदाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाले.
Soybean, Moong, Urad
Soybean, Moong, UradAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (भुसार माल मार्केट) गुरुवारी (ता. १०) सोयाबीन, मूग, उडदाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाले. गुरुवारी सोयाबीनची ६११ क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४५०० रुपये, तर सरासरी ४३०० रुपये दर मिळाले. मुगाची ६ क्विंटल आवक होती. मुगाला प्रतिक्विंटल ५९०० ते कमाल ६५०० रुपये तर सरासरी ६२०० रुपये दर मिळाले. उडदाची ११ क्विंटल आवक होती. उडदाला प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५३०० रुपये तर सरासरी ५०५० रुपये दर मिळाले.

केंद्र सरकारने यंदा सोयाबीनला प्रतिक्विंटल ४८९२ रुपये, मूग ८६८२, उडदाला ७४०० रुपये दर जाहीर केला आहे. हिंगोली धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) सप्टेंबरच्या अखेरच्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात १०० ते १५० रुपयांनी सुधारणा झाली होती. परंतु त्यानंतरच्या आठवाड्यात यंदाच्या हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात घट सुरू झाली आहे.

Soybean, Moong, Urad
Soybean Market: सोयाबीनच्या भावात नरमाई

ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याच्या कारणामुळे सोयाबीनची कमी दराने खरेदी केली जात आहे. बुधवारी (ता. ९) सोयाबीनची ८१५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४०५० ते कमाल ४४८० रुपये तर सरासरी ४२६५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ८) ११०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३९९० ते कमाल ४४८० रुपये तर सरासरी ४२२५ रुपये दर मिळाले.

Soybean, Moong, Urad
Moong Rate : हिंगोली बाजार समितीत मूग १०,००० ते १३,०५० रुपये दर

शनिवारी (ता. ५) ९६१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४०५० ते कमाल ४५४५ रुपये. तर सरासरी ४२९७ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ४) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४२४२ ते कमाल ४६४१ रुपये, तर सरासरी ४४४१ रुपये दर मिळाले.

मूग, उडदाची आवक आणि दर कमी

हिंगोली धान्य बाजारात मूग, उडदाची एक-दोन दिवसाआड आवक होत आहे. मंगळवारी (ता. ८) मुगाची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ८१०० ते कमाल ८८०० रुपये तर सरासरी ८४५० रुपये दर मिळाले. उडदाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६६०० ते कमाल ७५०० रुपये, तर सरासरी ७०५० रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. ५) उडदाची ११ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ९०५० ते कमाल ९६००, तर सरासरी ९३२५ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com