Onion Cultivation: अहिल्यानगरला कांदा लागवड क्षेत्रात ६४ हजार हेक्टरने वाढ

Onion Farming: अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदाही विक्रमी कांदा लागवड केली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार रब्बी हंगामात ६४ हजार हेक्टरने तर वर्षभरात तब्बल १.१८ लाख हेक्टरने कांदा लागवड वाढली आहे.
Onion Farming
Onion FarmingAgrowon
Published on
Updated on

Ahilyangar News: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने यंदाच्या वर्षभरातील कांदा लागवडीचे अंतिम क्षेत्र जाहीर केले आहे. यंदा गतवर्षीपेक्षा रब्बीत ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर अधिक लागवड झाली आहे. वर्षाभराच्या कांदा क्षेत्राचा विचार केला तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर अधिक कांदा उत्पादन घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

उसाचा आणि साखर कारखान्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून कांदा, कापूस व अन्य पिकांचे क्षेत्र वाढत आहे. अलीकडच्या चार-पाच वर्षांत कांद्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मागील दोन वर्षांत कांद्याला पुरेसा दर मिळाला नाही. यंदाही फारसा दर नाही, असे असूनही कांदा लागवड क्षेत्र वाढतच आहे. खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळी मिळून साधारणपणे पावणेदोन ते दोन लाख हेक्टरवर कांद्याचे क्षेत्र असते.

Onion Farming
Onion Market : कांद्याचे पैसे थकविल्याने शेतकरी संतप्त

यंदा त्यात बऱ्यापैकी वाढ होताना दिसत आहे. यंदा खरिपात २० हजार २६८ हेक्टर, लेट खरिपात ५५ हजार ३४८ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्‍चित केले होते. मात्र यंदा खरिपात ३६ हजार ३८१, तर लेट खरिपात ७८ हजार ८१४ असे १ लाख २१ हजार १९३ हेक्टरवर लागवड झाली होती. रब्बीचे १ लाख १९ हजार ५६१ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्‍चित आहे. यंदाचे एकूण कांदा लागवडीचे अंतिम क्षेत्र कृषी विभागाने जाहीर केले आहे. त्यात या वर्षी रब्बीत २ लाख ४ हजार ८४९ हेक्टवर कांदा लागवड झाली आहे.

गतवर्षी रब्बीत १ लाख ४० हजार ७३५ हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा ६४ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीत वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. खरीप, लेट खरीप आणि रब्बीत मिळून गतवर्षी २ लाख १ हजार ८३७ हेक्टरवर कांदा लावला गेला होता. यंदा ३ लाख २० हजार हेक्टर म्हणजे गतवर्षीपेक्षा १ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावर अधिक कांदा पीक घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Onion Farming
Onion Seed Production : जळगाव जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन क्षेत्र यंदा कमी

यंदा पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, शेवगाव, कर्जत भागात कांदा पिकाला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. कोपरगाव, अकोले, श्रीगोंद्यात मात्र यंदा गतवर्षीपेक्षा लागवड क्षेत्र कमी झाले आहे. बाजारात कांदा दर अजूनही फारसा नाही. यंदा कांदा लागवड क्षेत्र अधिक असले तरी या वर्षी पाण्याची पातळी दरवर्षीपेक्षा लवकर खालावली असल्याने कांदा उत्पादकांना त्याचा फटका बसला आहे.

रब्बीतील कांदा लागवड कंसात गतवर्षीची लागवड (हेक्टर)

अहिल्यानगर ः ९,२४० (६,३५३), पारनेर ः ४४,३७९ (१९,७७०), पाथर्डी ः १४,५३८ (६,७६५), कर्जत ः २२,१८३ (१३,०८८), जामखेड ः ६,७१२ (४,६५२), श्रीगोंदा ः १६,९४१ (१८,५८७), श्रीरामपूर ः ९,९६१ (५,९००), राहुरी ः ११,०१० (८,३१७), नेवासा ः २३,२१७ (२०,०३४), शेवगाव ः ११,५०५ (८,५७४), संगमनेर ः १४,१५२ (५,८०४), कोपरगाव ः ८,५५९ (९,४०४), अकोले ः ९,०३५ (१०,१३०), राहाता ः ३,४१६ (३,१५७)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com