Cotton Crop Damage : प्री-मॉन्सून कापूस क्षेत्राला वऱ्हाडात मोठा तडाखा

सततच्या पावसाने वऱ्हाडातील प्री-मॉन्सून कापूस पट्ट्यात मोठे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. परिपक्व झालेली बोंडे काळी पडत असून काही ठिकाणी उमललेल्या बोंडातील सरकीला कोंबसुद्धा फुटू लागले आहेत.
Cotton Crop Damage
Cotton Crop DamageAgrowon

अकोला ः सततच्या पावसाने वऱ्हाडातील प्री-मॉन्सून कापूस (Pre-Monsoon Cotton) पट्ट्यात मोठे नुकसान (Cotton Crop Damage) होत असल्याचे समोर आले आहे. परिपक्व झालेली बोंडे काळी (Ripe Boll Turn To Black) पडत असून काही ठिकाणी उमललेल्या बोंडातील सरकीला कोंबसुद्धा (Cotton Boll Sprouting) फुटू लागले आहेत. शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात येणाऱ्या दर्जेदार कापसाचे एकरी दोन तीन क्विंटलचे हे नुकसान (Cotton Crop Dmaage) सहन करावे लागत आहे.

विभागात प्रामुख्याने सातपुड्यालगतच्या तालुक्यात कापूस क्षेत्रात वाढ झालेली आहे. जळगाव जामोदपासून तर अकोटपर्यंत कापूस लागवड झालेली आहे. यापैकी अनेकांनी प्री-मॉन्सून, तर काहींची जूनच्या पहिल्या आठवड्यातील लागवड आहे. या क्षेत्रात काही ठिकाणी कापूस वेचणीचा मुहूर्तसुद्धा शेतकऱ्यांनी केला आहे. सततच्या पावासाने आधीच बोंड धारणा कमी झाली, त्यातच या पावसामुळे मोठे नुकसान होऊ लागले आहे.

Cotton Crop Damage
Cotton Crop Damage : खानदेशात कपाशीच्या पक्व कैऱ्यांचे नुकसान

कपाशीच्या झाडांवर सध्या २५ ते ३५ बोंड परिपक्व झालेले आहेत. यापैकी ८ ते १० बोंड काळे पडणे, उमलेल्या बोंडातील सरकीला कोंब फुटणे असे प्रकार घडत आहे. वास्तविक कपाशीच्या झाडावर सर्वांत आधी लागलेल्या बोंडाचा कापूस दर्जेदार व वजनदार राहतो. या कापसाला दरही चांगला मिळत असतो. खेडा खरेदीमध्ये व्यापाऱ्यांनी यंदा कापसाचा मुहूर्त ११ हजारांवर केलेला आहे.

Cotton Crop Damage
Cotton Rate : पूर्वहंगामी कापूस काळवंडू लागला

गेल्या हंगामाप्रमाणेच त्यामुळे यंदाही चांगला दर मिळेल अशी आशा शेतकरी लावून होता. कपाशीचे पीकसुद्धा आजवर चांगले राहिल्याने कापूस उत्पादक चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेत होता. या स्वप्नाला सलग पावसाने आता टाच लावली आहे. पाऊस उघाड देत नसल्याने बोंड काळवंडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांना सध्याच काळ्या झालेल्या, कोंब फुटलेल्या बोंडामुळे एकरी तीन क्विंटलपर्यंत फटका बसला आहे.

बाजारभावाने याचा विचार केल्यास एकरी २५ ते ३० हजारांचे सरासरी नुकसान सुरुवातीलाच झालेले आहे. अद्यापही पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने हे नुकसान आणखी वाढण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यंदा शेकडो हेक्टरमध्ये प्री-मॉन्सून लागवड झालेली आहे.

मी ६ जूनला १० एकरांत कपाशीची लागवड केलेली आहे. या क्षेत्रात कापूस वेचणीचा मुहूर्तही केला होता. आता आठवडाभरापासून पाऊस होत असल्याने बोंड काळे पडणे, त्यातून कोंब बाहेर येऊ लागले. खराब झालेल्या बोंडांची संख्या पाहता एकरी अडीच ते तीन क्विंटलपर्यंत कापूस उत्पादन घटणार आहे. पुढे हे नुकसान आणखी किती वाढेल, हे आताच सांगता येत नाही.
प्रमोद राहणे, शेतकरी, टुनकी, ता. संग्रामपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com