Hapus Mango Market : वाशीत हापूसचे दर तीनशे रुपयांनी वधारले

Maharashtra Alphonso Market: आरंभीच्या बहरातील आंबा संपुष्टात आल्यामुळे वाशी बाजारातील आवक कमी झाली आहे. परिणामी, हापूस आंब्याच्या पाच डझनांच्या पेटीचा दर २०० ते ३०० रुपयांनी वाढला आहे.
Mango Market
Mango Market Agrowon

Mango Market Update Ratnagiri : आरंभीच्या बहरातील आंबा संपुष्टात आल्यामुळे वाशी बाजारातील (Hapus Mango Arrival) आवक कमी झाली आहे. परिणामी, हापूस आंब्याच्या पाच डझनांच्या पेटीचा दर (Mango Rate) २०० ते ३०० रुपयांनी वाढला आहे. दर्जेदार फळासाठीच दर वाढला असला तरीही यंदा मुळातच उत्पादन (Mango Production) कमी असल्याने दरवाढीचा फायदा थोड्याच बागायतदारांना मिळणार आहे.

कोकणातील आंब्याचे वाशी बाजारातील आगमन तुलनेत यंदा लवकर झाले. फेब्रुवारीच्या अखेरीस बऱ्यापैकी पेट्या वाशीमध्ये विक्रीला पाठवल्या गेल्या.

गुढीपाडव्यानंतर आंब्याच्या पेट्यांची संख्या पन्नास हजारांवर पोहोचली होती; परंतु गेल्या आठ दिवसांमध्ये आवक घटली असून सुमारे दहा ते बारा हजार पेट्या कमी दाखल होत आहेत.

Mango Market
Hapus Mango Market : मुंबईत बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली ; दरात घसरण

गुरुवारी (ता. ६) ३५ हजार पेट्यांची नोंद झाली आहे. यामध्ये रत्नागिरीतून चाळीस टक्के, तर उर्वरित सिंधुदुर्ग, रायगडमधील पेट्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी वाशीतील दलाल आणि रत्नागिरीतील आंबा बागायतदार यांच्यात झालेल्या बैठकीत हापूसचे दर स्थिर राहावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

त्या वेळीही आवक कमी झाली की दर वाढतील असे दलालांकडून सांगण्यात आले. आंबा कमी येऊ लागल्यामुळे ४ हजारांना मिळणाऱ्या पाच डझनांच्या पेटीला ४३०० रुपये द्यावे लागत आहेत. वाढ कमी असली तरीही यंदा प्रथमच असा बदल झाल्याचे बागायतदार सांगत आहेत.

Mango Market
Mango Market : वाशी बाजारातील हापूस दरात होणारी घसरण थांबवा

हवामानातील बदलांमुळे यंदा दुसऱ्या टप्प्यातील बहरात अपेक्षित उत्पादन बागायतदारांच्या हाती आलेले नाही. थ्रीप्ससह उन्हाच्या कडाक्यामुळे फळगळ झाली. त्याचा परिणाम हळूहळू जाणवू लागला असून, १५ एप्रिलनंतर उत्पादन कमी असल्याचे जाणवणार आहे. दलालांनी सध्या उपलब्ध आंब्याला दर वाढवून दिला असला तरीही त्याचा फायदा मोजक्याच बागायतदारांना होणार आहे.

‘थ्रीप्स’वर केव्हीकेने संशोधन करावे

कडाक्याचा उन्हाळा आणि त्यानंतर अचानक पडलेली थंडी, अवकाळी पाऊस अशा वातावरणामुळे आंबा गळ, फळावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.

महागडी कीटकनाशके फवारूनही थ्रिप्स नियंत्रणात आणता आलेला नाही. भविष्यात आंबा व्यावसाय टिकवून ठेवायचा असेल, तर कोकण कृषी विद्यापीठाकडून यावर संशोधन करणे गरजेचे आहे, असे आंबा बागायतदारांकडून सांगितले जात आहे.

आवक कमी झाल्यामुळे दर्जेदार फळासाठीचे हापूसचे दर वाढविण्यात आले आहेत. ही आवक पुढील काही दिवस कमी राहण्याची शक्यता आहे. सध्या ३५ ते ३८ हजार पेट्याच कोकणातून वाशीत येत आहेत.
- संजय पानसरे, संचालक, बाजार समिती, वाशी
हवामानातील बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर झालेला आहे. यंदा जमेची बाजू कमी आणि खर्च अधिक असे चित्र आहे. कीटकनाशकांचा खर्च आणि बँकांची कर्ज फेडतानाही बागायतदारांना कसरत करावी लागेल.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com