Chili Market Update : यंदा देशात अनेक ठिकाणी लांबलेला उन्हाळा व काहीशा उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
त्यामुळे अनेक राज्यांत दरात सुधारणा झाली आहे. प. बंगालमध्येही भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहेत. टोमॅटो, मिरचीच्या भावात अवघ्या १५ दिवसांत २०० टक्क्यांनी सुधारणा झाली आहे.
टोमॅटोचे ४० ते ५० रुपये किलो असणारे भाव आता १३० ते १५० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. त्याचप्रमाणे, हिरवी मिरचीला ३५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. इतर भाज्यांच्या दरातही ३० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राजधानी कोलकत्यासह इतर जिल्ह्यांतील परिस्थितीही वेगळी नाही. या जिल्ह्यांतील भाजीपाल्यांच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे.
प. बंगाल विक्रेता संघटनेचे कमल डे म्हणाले, की कमालीची उष्णता व पावसाअभावी भाजीपाल्यांच्या किमतीत एवढी सुधारणा झाली आहे. भाजीपाला पिके सुकली असल्याने भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
मात्र, आता मॉन्सूनच्या आगमनानंतर पाऊस पडल्यानंतर पिकांना जीवदान मिळून पुढील १५ दिवसांत या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, नवीन टोमॅटोही पुढील १० ते १५ दिवसांत बाजारात येण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारकडून दखल
प. बंगालमध्ये भाजीपाल्याच्या दरात झालेल्या वाढीचा दखल राज्य सरकारनेही घेतली आहे. सरकारने किरकोळ विक्रीच्या आपल्या सुफल बांगला या संस्थेलाही कोलकत्यात बाजारभावापेक्षा कमी दरात भाजीपाला विक्री करण्याची सूचना केली आहे.
त्यानुसार, संस्थेकडून टोमॅटोची प्रतिकिलो ११५ रुपये आणि हिरवी मिरची २४० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे.
भाजीपाल्याचे दर (प्रतिकिलो रुपयांत)
टोमॅटो १३०
हिरवी मिरची ३५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.