Team Agrowon
उन्हाचा पारा वाढलेला असतानाच लाल मिरची खरेदीसाठी ग्राहकांची मोठी लगबग बाजारात पाहावयास मिळत आहे.
घरगुती तिखट तसेच मसाला तयार करण्यासाठी म्हणून लाल मिरचीला मोठी मागणी आहे; मात्र अवकाळी पावसाने आवक कमी झाल्याने चाळीस दिवसांत लवंगी, गुंटूर, चपाटाचे भाव वधारले आहेत.
लाल तिखट असो की विविध प्रकारचे तयार मसाले बाजारात, किराणा दुकानांत उपलब्ध आहेत; मात्र असे असतानाही उन्हाळा सुरू होताच वर्षभर पुरेल इतका लाल तिखट, घरगुती मसाला तयार करून घेण्यावर अनेकांचा भर असतो.
चांगल्या प्रकारे वाळलेली लाल मिरचीची आवक जानेवारीपासून बाजारात उपलब्ध झाली आहे.
स्थानिक भागासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणातून लाल मिरचीची प्रामुख्याने आवक होते.
मात्र यंदा स्थानिक भागांबरोबरच तेलंगणातूनदेखील दरवर्षीच्या तुलनेत आवक कमीच होत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात दाखल झालेल्या बेडगी, गुंटूर, तेजा, चपाटा, रसगुल्ला, काश्मिरी, संकेश्वरीसह तिखट लवंगी मिरचीच्या दरात ८ ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बाजारात सध्या लाल मिरचीचे भावही वाढले आहेत.