Grape Sales in Maharashtra: ‘द्राक्ष माल न्या, जागेवर पैसे द्या ; ‘पेड कटिंग जोरात’

Grape Rate : द्राक्ष हंगामात अनेकदा बंपर क्रॉपमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित परतावा मिळत नाही. परिणामी द्राक्ष माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांचा शोध घेऊन व्यवहार केले जातात.
Grape Farming
Grape Market Agrowon
Published on
Updated on

Nashik News : द्राक्ष हंगामात अनेकदा बंपर क्रॉपमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित परतावा मिळत नाही. परिणामी द्राक्ष माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांचा शोध घेऊन व्यवहार केले जातात. यंदा नैसर्गिक आपत्तीचा फटका द्राक्ष बागांना बसल्याने ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी असल्याचे समोर आले आहे.

परिणामी मालाला उठाव आहे. त्यामुळे ‘व्यापाऱ्यांनो द्राक्ष माल न्या आणि जागेवर पैसे द्या’ या पद्धतीने द्राक्ष उत्पादकांकडून शिवार ‘पेड कटिंग’ पद्धतीने खरेदी जोरात सुरू आहे. यंदा हे प्रमाण जवळपास ३५ टक्क्यांपर्यंत आहे.

यंदाच्या हंगामात अतिवृष्टी व मॉन्सूनोत्तर पावसामुळे नुकसान वाढले. राज्यातील नाशिक, सांगली, सोलापूर या मुख्य द्राक्ष उत्पादक पट्ट्यात छाटणीपासूनच बागा अडचणीत सापडल्या. मालाची उपलब्धता कमी असून द्राक्ष उत्पादनात सरासरीच्या तुलनेत ४० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दर टिकून असल्याचे चित्र आहे.

Grape Farming
Grape Production Drop: द्राक्ष हंगाम संकटात! यंदा उत्पादनात ४०% घट

मागील दोन वर्षांपासून मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्यानंतर ‘पेड कटिंग’ पद्धतीने नाशिक विभागात व्यवहार होत आहेत. ही नवी व्यवहाराची पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. मागील काही वर्षांत मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्यानंतर व्यापारी व निर्यातदारांच्या मागे धावण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांच्या समोर होती.

मात्र यंदा द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यामागे धावाधाव न करता मालाची खरेदी होत आहे. ‘पेड कटिंग’ पद्धतीने बागेत व्यापाऱ्यांकडूनच खुडे, त्यानंतर काटा झाल्यानंतर भरलेले मालाचे वाहन रवाना होण्यापूर्वी जागेवरच ‘काटा पेमेंट’ पद्धतीने रोख पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत.

Grape Farming
Indian Grape Market: भारतीय द्राक्षाला न्यूझीलंडची दारे उघडण्याची शक्यता

किलोमागे २५ ते ४० रुपयांपर्यंत फायदा

शिवार खरेदी पद्धतीने व्यापारी स्वतः द्राक्षाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करून दर ठरवतात. त्यानंतर स्वतःच्या मनुष्यबळामार्फत द्राक्ष काढणी केली जाते. काढणीपश्चात मालाची हाताळणी व प्रतवारी करून थेट जागेवरच पॅकिंग करून विविध बाजारपेठांमध्ये ही द्राक्षे जातात. त्यामुळे बागेत मागे माल उरत नाही. माल कमी आहे, मात्र दरवर्षीच्या तुलनेत किलोमागे जवळपास २५ ते ३५ रुपयांपर्यंत फायदा होत आहे.

सध्याची दर स्थिती (दर रुपये, प्रति किलो)

मालाचा प्रकार...किमान...कमाल...सरासरी

सफेद गोल वाण...६०...७५...६५

सफेद लांबट...६०...९०...७५

रंगीत...९०...१५०...१२०

नाशिक विभागात ७५ टक्क्यांवर हंगाम आटोपला आहे. त्यात दरवर्षीच्या तुलनेत माल ३० टक्क्यांवर माल कमी आहे. मागणी असल्याने स्थानिक बाजारात मागणी असल्याने दर टिकून आहे. निर्यातक्षम मालाला मिळणारे दर यंदा लांबट द्राक्ष वाणाला स्थानिक मालाला मिळत आहे. पेड कटिंग सुरू असल्याने मजूर, श्रम व मजूर खर्च कमी झाला आहे. काढणी झालेल्या मालाला कमिशन, आडत लागत नाही. सुरुवातीला उत्पादनाच्या अंगाने अडचणी आल्या; मात्र यंदा चित्र आशादायी आहे.
- बाळासाहेब गडाख, विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक
द्राक्ष उत्पादन कमी असल्याने व्यापारी स्वतःच्या मजुरांकडून माल खुडून नेत आहेत. पूर्वी द्राक्षाची खुडे करताना निसाई अधिक व्हायची, काही माल शिल्लक ठेवला जायचा. यंदा वेलीवरील संपूर्ण माल खुडून नेला जात आहे. उत्पादन कमी असले तरी उत्पन्नवाढीसाठी मदत झाली आहे.
- बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वडनेर भैरव, ता. चांदवड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com