Indian Grape Market: भारतीय द्राक्षाला न्यूझीलंडची दारे उघडण्याची शक्यता

Market Update: भारतीय द्राक्षांसाठी न्यूझीलंडच्या बाजारपेठेचा दरवाजा खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जैवसुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेली आयात पुन्हा सुरू करण्याबाबत न्यूझीलंडचे शिष्टमंडळ महाराष्ट्र दौर्‍यावर असून, चाचणी खेपेस मंजुरी देण्याचा विचार सुरू आहे.
Grapes
GrapesAgrowon
Published on
Updated on

Pune News: भारतीय द्राक्षासाठी न्यूझीलंडच्या बाजारपेठेची दारे उघडी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उभय देशांमध्ये सकारात्मक चर्चा चालू असून, न्यूझीलंडचे एक शिष्टमंडळ सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे.

न्यूझीलंड व भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक बैठक सोमवारी (ता. १७) मुंबईतील अपेडाच्या कार्यालयात झाली. चर्चेत अपेडाच्या महाव्यवस्थापिका विनिता सुधांशू, उपमहाव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती अलगीकरण (प्लॅन्ट क्वारंटाइन) विभागाचे सहसंचालक डॉ. एस. ग्यानसबंधन तसेच न्यूझीलंड शिष्टमंडळातील केरेन पौग, श्रीमती लिली ब्रेलफोर्ड तसेच श्रीमती आदर्शना मिस्त्री यांचा समावेश होता.

Grapes
Grape Export: सांगली जिल्ह्यातून तीन हजार टन द्राक्ष निर्यात

...म्हणून आयात पुन्हा चालू करा

या वेळी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन पद्धतीची शास्त्रोक्त माहिती शिष्टमंडळाला दिली. ‘‘देशातील ९४ टक्के द्राक्षे एकट्या महाराष्ट्रातून निर्यात होतात. २०२३-२४ मध्ये निर्यात ३.२४ लाख टनांहून अधिक होती. सध्या नेदरलँड, पोलंड, रोमानिया, जर्मनी, इंग्लंड, चीनसह अशा बऱ्याच देशांना भारतीय द्राक्षे निर्यात होतात. जैवसुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने भारतीय द्राक्ष आयात बंद ठेवली आहेत. तथापि, आता गुणवत्तापूर्ण उत्पादन होत असल्याने आयात पुन्हा सुरू करावी,’’ असे डॉ. मोते यांनी केले.

Grapes
Grape Export: निर्यातक्षम द्राक्षांचे दर नियंत्रणात आणण्याचा डाव!

राज्याच्या कृषी विभागामार्फत ग्रेपनेटप्रणालीतून निर्यातक्षम शेतकऱ्यांची नोंदणी होते. कीड व रोग नियंत्रण उत्तम पद्धतीने केले जाते. राज्यात कृषी माल निर्यात मार्गदर्शन कक्षदेखील सुरू करण्यात आले आहेत. चालू वर्षी निर्यातक्षम शेतनोंदणी एक लाखांच्या पुढे गेली आहे. त्यापैकी ४२ हजार ३०० उत्पादक केवळ द्राक्ष पिकाचे आहेत.

त्यामुळे न्यूझीलंडची बाजारपेठ खुली झाल्यास भारतीय शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असेही या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, या बैठकीनंतर शिष्टमंडळाने राज्याच्या काही भागांना भेटी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याच विषयावर आज (ता.२०) पुन्हा दुसरी बैठक घेण्याचे निश्‍चित केले आहे.

चाचणी खेपेला मान्यता मिळणे शक्य

न्यूझीलंड शिष्टमंडळाच्या प्रमुख श्रीमती केरेन पौग बैठकीत काही मुद्दे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, की कृषी आयात निर्यात सुरू करण्याच्या प्रक्रिया वेळखाऊ आहेत. परंतु आम्ही राज्यातील बागांना प्रत्यक्ष भेटीनंतर चाचणी खेप (ट्रायल शिपमेंट) करण्यासाठी परवानगी देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com