
Parbhani News : यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात परभणी-हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीनच्या पेरणीने सरासरी क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. परभणी जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ५४ हजार ३८२ हेक्टर असतांना आजवर प्रत्यक्षात २ लाख ६४ हजार २०४ हेक्टर (१०४ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ४८ हजार ६५५ हेक्टर असतांना यंदा प्रत्यक्षात २ लाख ७२ हजार ४६३ हेक्टर (१०९.५७ टक्के) पेरणी झाली आहे.
या दोन जिल्ह्यात सोयाबीनची एकूण ५ लाख ३६ हजार ६६७ हेक्टरवर पेरणी झाली असून ९ तालुक्यामध्ये सोयाबीनच्या पेरणीत वाढ झाली आहे. कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार शुक्रवार (ता. १) पर्यंत परभणी जिल्ह्यात एकूण खरिपाची सरासरी ५ लाख १८ हजार ४६७ पैकी ४ लाख ९९ हजार १८३ हेक्टरवर (९६.२८ टक्के ) पेरणी झाली. त्यात सोयाबीनची २ लाख ६४ हजार २०४ हेक्टर पेरणी झाली.
कडधान्यांमध्ये तुरीची ४२ हजार ६०२ पैकी ३४ हजार ४५४ हेक्टर(८०.८७ टक्के), मुगाची १७ हजार ६०० पैकी ५ हजार ६२४हेक्टर (३१.९६ टक्के), उडदाची ६ हजार ४१३ पैकी १ हजार ८६८ हेक्टरवर (२९.१४ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांमध्ये ज्वारीची ३ हजार ८५७ पैकी ७८९ हेक्टर (२०.४५ टक्के), बाजरीची ४९९ पैकी ९८ हेक्टर (१९.६ टक्के), मक्याची ९८३ पैकी ५०१ हेक्टर (५१.०३टक्के) पेरणी झाली आहे.
तिळाची १०९ हेक्टर, कारळाची ५९.१६ हेक्टरपेरणी झाली. कपाशीची १ लाख ९१ हजार ९५४ पैकी १ लाख ९१ हजार ४३१ हेक्टर (९९.७३ टक्के) लागवड झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण खरिपाची सरासरी ४ लाख १० हजार ३९८ पैकी ३ लाख ५२ हजार २६ हेक्टरवर (८७.७८ टक्के) पेरणी झाली. त्यात सोयाबीनची २ लाख ७२ हजार ४६३ हेक्टरवर पेरणी झाली.
कडधान्यांमध्ये तुरीची ३१ हजार ३४ हेक्टर, मुगाची ४ हजार २८० हेक्टर, उडदाची ३ हजार १७३ हेक्टर पेरणी झाली. तृणधान्यांमध्ये ज्वारीची २ हजार ५८६ हेक्टर, मक्याची २५१ हेक्टर पेरणी झाली. भुईमुगाची ४ हेक्टर, तीळाची ११.५८ हेक्टर, कारळाची ३१ हेक्टर पेरणी झाली. कपाशीची ३६ हजार ९११ हेक्टरवर लागवड झाली. परभणी हिंगोली जिल्ह्यातील ९ तालुक्यामध्ये मध्ये सोयाबीनची सरासरीपेक्षा जास्त तर ५ तालुक्यांमध्ये सरासरीहून कमी पेरणी झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.