Ethanol Production : इथेनॉलमुळे मक्याला चांगले दिवस येणार?

Team Agrowon

मका पिकाला चांगले दिवस

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उसावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. यातच आता इथेनॉल बंदिची भर पडली आहे. मात्र यामुळे आता मका पिकाला चांगले दिवस येणार आहे. तर शेतकऱ्यालाही दोन पैसे मिळतील.

Ethanol Production | Agrowon

इथेनॉलसाठी मक्याला मागणी

केंद्र सरकारने उसाच्या रसापासून बनणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. तर मक्याला यातून वगळले आहे. ज्यामुळे आता इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Ethanol Production | Agrowon

मका उत्पादन कमी

देशात मागील हंगामात मका उत्पादन हे ३५९ लाख टन झाले होते. जे या वर्षी ३४३ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. यंदा उत्पादन घटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पाऊस कमी. त्याचा फटका मका पिकाला बसला.

Ethanol Production | Agrowon

भारताचा मका महाग

देशात ऑगस्ट महिन्यापासून मक्याचे भाव काहीसे वाढले आहेत. पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव कमी होत गेले. त्यामुळे भारताचा मका आंतरराष्ट्रीय बाजारात महाग होत गेला.

Ethanol Production | Agrowon

मक्याला उठाव मिळू शकतो?

एकीकडे ऊस आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मीतीवर बंदी घालताना देशातील इथेनॉल उत्पादन घटणार नाही, असाही दावा सरकारने केला. यामुळे धान्यापासून इथेनॉल निर्मिती वाढू शकते.

Ethanol Production | Agrowon

इथेनॉलसाठी मक्याचा वापर

देशात केवळ मक्याचा पुरवठा चांगला दिसतो आणि किमतीही नियंत्रणात आहेत. त्यामुळे इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढू शकतो. एक टन मक्यापासून ३७० लिटर इथेनॉल मिळते.

Ethanol Production | Agrowon

१२५ लाख टन मका

देशात यंदा ३२५ लाख टन मक्याचा वापर होण्याचा अंदाज आहे. यापैकी २०० लाख टन पशुखाद्यसाठी होऊ शकतो तर १२५ लाख टन मानवी आहार, बियाणे आणि औद्योगिक वापरासाठी होऊ शकतो, असाही अंदाज आहे.

Ethanol Production | Agrowon

NEXT - द्राक्ष मण्याचा आकार वाढविण्यासाठी काय कराल?

आणखी पाहा..