Government Procurement Center : शासकीय खरेदी केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर

आगामी काळात खरीप हंगामातील पिकांच्या खरेदीसाठी असलेली शासकीय खरेदी केंद्र कापूस फेडरेशनप्रमाणे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Government Procurement Centre
Government Procurement CentreAgrowon

अमरावती : मूग (Mug), उडीद ( Udid) व सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच मका (Maize) व ज्वारी (Jwari) उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगच्या शासकीय केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.

त्यामुळे आगामी काळात खरीप हंगामातील (Rabbi Season) पिकांच्या खरेदीसाठी असलेली शासकीय खरेदी केंद्र कापूस फेडरेशनप्रमाणे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता या हंगामातील तूर (Tur) व चणा विक्रीसाठी आला तरच ही केंद्रे जिवंत राहू शकणार आहेत.

अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात ९८ टक्के पेरणी झाली होती. त्यामध्ये सोयाबीन २ लाख ५२ हजार व कापूस २ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रात तर, तुरीची पेरणी १ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रात होती.

भरड धान्यात मोडणारी ज्वारी १० हजार ८३९ व मका २० हजार ५७६ हेक्टरमध्ये होता. तर मुगाची ७७३९ व उडदाची १९०६ हेक्टरमध्ये पेरणी झाली.

ज्वारीची या वर्षी उत्पादकता हेक्टरी ४४०.६३ किलो आली आहे. मका काढणीच्याच अवस्थेत आहे. सोयाबीनची हेक्टरी ६३९ किलो, मूग २५.७ किलो व उडदाची २८.५५ किलो उत्पादकता आहे.

नोंदणी केली मात्र विक्री नाही

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू केलेल्या शासकीय केंद्रांवर ज्वारी विक्रीसाठी मोर्शी येथे ३ व मक्यासाठी ३ अशा ८ व मक्यासाठी मोर्शी १२ व वरूड १४ अशा २६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

Government Procurement Centre
MSP Procurement : नाफेडचे आधारभूत केंद्र निराधार

मात्र एकाही शेतकऱ्याने शेतीमालाची विक्री केली नाही. सोयाबीनसह मूग व उडीद या पिकांच्या उत्पादकांनी तर नोंदणीही केली नाही.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने अचलपूर, मोर्शी, वरूड, चांदूरबाजार व चांदूररेल्वे या पाच तालुक्यांत तर, विदर्भ मार्केटिंगची उर्वरित सात ठिकाणी शासकीय नोंदणी व खरेदी केंद्रे आहेत.

या वर्षी हमीदरापेक्षा अधिक भाव मिळाल्याने शेतकरी शासकीय केंद्रांवर आला नाही. मात्र खुल्या बाजारात दर पडल्यास शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध राहावी, यासाठी केंद्रे सुरू केली आहेत. भरडधान्यासाठी मुदतवाढ दिली तरी स्थिती बदलली नाही.
कल्पना धोपे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com