Sugar Export: केंद्राकडून १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी; महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक कोटा

Maharashtra Sugar Industry: केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी १० लाख टनांचा कोटा मंजूर केला आहे, ज्यात महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा मिळाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील साखर उद्योगाला मोठा फायदा होणार असून, त्याद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक हित साधले जाईल. साखर निर्यातीमुळे जागतिक बाजारात भारताची स्थिती मजबूत होईल.
Sugar
SugarAgrowon
Published on
Updated on

Pune News: केंद्र सरकारने अखेर एक वर्षानंतर साखर निर्यातीला आंशिक परवानगी दिली आहे. ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राने १० लाख टन साखर निर्यातीला परावनगी दिली आहे, असे केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवरून सांगितले. तर महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक कोटा आला आहे.

भारताने देशातील घटलेले उत्पादन आणि वाढते भाव लक्षात घेऊन मागील हंगामात साखर निर्यातीला परवानगी दिली नव्हती. तर २०२२-२३ च्या हंगामात ६० लाख टन निर्यात झाली होती. २०२१-२२ मधील निर्यात ११० लाख टन झाली होती. २०२३ृ२४ हंगामात देशातील उत्पादन घटून भाव वाढले होते. त्यामुळे भारत सरकारने निर्यातीला परवानगी दिली नव्हती. पण यंदा देशातील उत्पादन आणि देशातील दराची स्थिती पाहता सरकारने मर्यादीत परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री जोशी यांनी म्हटले आहे.

Sugar
Sugar Industry : ‘छत्रपती’ कारखान्याकडून ३ लाख ६४ हजार टन गाळप पूर्ण

मंत्री जोशी यांनी एक्सवरील संदेशात म्हटले आहे की, सरकारने १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी देताना देशातील साखर कारखाने आणि ऊस उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवले आहे. ५ कोटी ऊस उत्पादकांच्या कुटुंबांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर देशातील ५ लाख साखर कामगारांनाही फायदा होईल. सरकारने साखर कारखान्यांची आर्थिक उलाढाल वाढावी, ऊस उत्पादकांना वेळेत एफआरपी देता यावी आणि ग्राहकांना सारखेचा नियमित पुरवठा आणि संतुलित किंमतीचा लाभ मिळावा, यासाठी निर्यातीला परवानगी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Sugar
Sugar Production Decline : घटत्या साखर उत्पादनाने चिंता

महाराष्ट्राला निर्यातीचा सर्वाधिक कोटा

केंद्राने साखर निर्यातीचा १० लाख टनांचा कोट दिला आहे. त्यापैकी सर्वाधिक साखर निर्यात महाराष्ट्रातून होणार आहे. महाराष्ट्राला ३ लाख ७५ हजार टन निर्यातीचा कोटा देण्यात आला. तर उत्तर प्रदेशला २ लाख ७४ हजार टनांचा कोटा मिळाला. कर्नाटकला १ लाख ७५ हजार टन कोटा देण्यात आला. तर उर्वरित कोटा इतर राज्यांना देण्यात आला. पण जास्तीत जास्त कोटा या तीन राज्यांच्याच वाट्याला आला.

कारखान्यांना निर्यातीची परवानगी

निर्यात करतानाही कारखाना स्तरावर कोटा देण्यात आला आहे. कारख्यांना गेल्या हंगामातील सरासरीच्या ३.१७ टक्के निर्यात करता येईल. तसेच कारखाने आपल्या निर्यात कोट्याची आदला बदली करू शकतात. तसेच ज्या कारखान्यांना साखर निर्यातच करायची नाही ते आपला कोटा इतर कारखान्यांना देऊ शकतात. कोट्यांटी आदलाबदल कारखान्यांनी ३१ मार्चपर्यंत पूर्ण करायची आहे. तर ३० नोव्हेंबरच्या आधी निर्यातीचा कोटा पूर्ण करायचा आहे. कारखान्यांनी निर्यातीच्या प्रक्रियेबाबत काय काम केले याची माहिती सरकारला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com