
जळगाव : सध्या सोन्याच्या बाजारात (Gold Market) मंदीचे वातावरण आहे. सोन्याचे भाव (Gold Rate) दिवसेंदिवस कमी होत आहेत. सध्या भाव ५० हजार ८०० प्रतितोळा आहेत; मात्र येत्या तीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत सोळा टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा अंदाज सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांनी (Silver Trader) वर्तविला आहे. आता देशांतर्गत बाजारात सोने (Domestic Gold Market) प्रतिदहा ग्रॅमसाठी ५१ हजार रुपये आहे. मात्र सोने-चांदीच्या व्यापारातील विश्लेषकांच्या मते या वर्षाच्या शेवटपर्यंत सोने देशांतर्गत बाजारात साठ हजारांपर्यंत पोहोचू शकते.
विश्लेषकांच्या मते देशात महागाई निश्चितच आहे. महागाई खाली येत आहे. परंतु जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमती अधिक काळासाठी वाढलेल्या राहू शकतात. यामुळे सोन्याच्या दरवाढीला आधार मिळत आहे. कारण याला महागाईपासून बचावाचे साधन मानले जाते. महागाई वाढली, की सोन्यातील गुंतवणूक वाढते, असा आजवरचा इतिहास आहे. इतर देशातील परिस्थितीही याला कारणीभूत आहे. अमेरिकेतील मंदीची भीती, व्याजदरातील वाढ, शेअर बाजारातील अवास्तव तेजी आणि भू-राजकीय तणाव अशी यामागची कारणे असू शकतात.
शिवाय, ‘ब्लूमबर्ग’च्या सांगण्यानुसार वाढलेली महागाई अधिक काळापर्यंत राहील. यामुळे व्याजाचा दर वाढत राहील. आर्थिक मंदीकडे वाटचाल होणार नाही. अमेरिकेतील वेल्स फार्गोच्या अहवालानुसार ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मंदीची सुरुवात होईल, अशा स्थितीत डॉलर घसरेल व सोन्यात तेजी येईल.
तीन वर्षांतील सोन्याचे दर असे
वर्ष दर
७ ऑगस्ट २०२० ५६ हजार १२६
१ डिसेंबर २०२० ४८ हजार ५९२
५ फेब्रुवारी २०२१ ४७ हजार २३७
३१ मार्च २०२१ ४४ हजार १९०
१ जून २०२१ ४९ हजार ३१९
२८ सप्टेंबर २०२१ ४५ हजार ९५७
१८ नोव्हेंबर २०२१ ४९ हजार २३५
७ मार्च २०२२ ५३ हजार ५९५
२५ ऑगस्ट ५२ हजार ९४
३१ ऑगस्ट २०२२ ५१ हजार ५००
२ सप्टेंबर २०२२ ५० हजार ८००
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.