Sugar Production : जागतिक साखर उत्पादनात ५० लाख टनांपर्यंत वाढीचा अंदाज

Sugar Market : येत्या हंगामात (ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५) जगाच्या साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० लाख टनांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज झार्निको या आंतराष्ट्रीय व्यापार संस्थेने व्यक्त केला आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : येत्या हंगामात (ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५) जगाच्या साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० लाख टनांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज झार्निको या आंतराष्ट्रीय व्यापार संस्थेने व्यक्त केला आहे.

ही वाढ फारशी नसली तरी पूर्वीच्या अंदाजाच्या तुलनेत अधिक असल्याने संस्थेने सांगितले. या हंगामात साखरेचे उत्पादन १८६० लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचेही संस्थेने आपल्या अंदाजात म्हटले आहे.\

ब्राझीलमध्ये वाढणारे उत्पादन, युरोपीय देश व थायलंडमधील साखरेची संभाव्य वाढ गृहीत धरून हा वाढीचा अंदाज संस्थेने दिला आहे. साखरेचा खपही लोकसंख्या वाढीमुळे १८०० लाख टनांच्या पुढे अपेक्षित धरण्यात आला आहे.

यापूर्वी कंपनीने ब्राझीलमधील साखरेच्या हंगामाची धीमी सुरुवात पाहून साखरेचे उत्पादन काहीसे कमी होईल, असा अंदाज व्‍यक्त केला होता. पण सध्या ब्राझीलमध्ये साखर हंगामाने गती घेतल्याने संस्थेने उत्पादन वाढण्याचा अंदाज व्‍यक्त केला आहे. युरोपीय देशांमध्ये १७० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.

Sugar Production
Sugar Market : साखर कारखान्यांना जूनसाठी २५.५० लाख टनांचा कोटा

जगात ब्राझील साखर उत्पादनात अग्रेलर आहे. सध्या तेथील हंगाम एप्रिलपासून सुरू झाला. पहिल्या महिन्यात उत्पदनात आघाडी घेतली असली तरी दुसऱ्या महिन्यात मात्र पावसामुळे ऊसतोडणीत अडथळे आल्याने तोडणी मंदावली. यामुळे अंदाजापेक्षा कमी उत्पादन झाले. सध्या मात्र तिथे तोडणीने गती घेतली आहे.

ब्राझीलमध्ये उसाचे गाळप गेल्या वर्षीच्या तुलनेत बारा टक्क्यांनी वाढेल असाही अंदाज आहे. साखरेला दर असल्याने यंदाही ब्राझीलचे कारखाने साखर निर्मितीला प्राधान्य देत आहेत. यंदाच्या हंगामापासून तेथील कारखान्यांनी गाळप क्षमताही वाढविली असल्याने साखरेचे उत्पादन गतीने होईल, असा अंदाज सद्यःस्थितीचा आहे.

Sugar Production
Sugar Market : साखरेची ‘एमएसपी’ वाढवा

निर्यातीचा आलेख खाली

२०२२-२३ मध्ये जगात साखरेचे उत्पादन १७७० लाख टन झाले होते. २०२३-२४ मध्ये १८३० लाख टन उत्पादन झाले. या साखर उत्पादनात ब्राझील व भारताचा वाटाच पन्‍नास टक्क्यांहून अधिक राहिला.

२०२१-२२ मध्‍ये भारतातून विक्रमी ११० लाख टन साखर विविध देशांना पाठविण्‍यात आली. त्‍यानंतर आलेख झपाट्याने खाली आला. २०२२-२३ ला ६० लाख टन साखर भारतातून निर्यात झाली. २०२३-२४ ला निर्यातबंदी लादल्याने निर्यातीला चाप बसला

देशातील साखर उत्पादनाबाबत संभ्रम

यंदा भारतात किती साखर उत्पादन होईल याबाबत संभ्रम आहे. या उद्योगातील अनेक संस्था कारखाना प्रतिनिधींची बैठक घेऊन अंदाज घेत आहेत. गेल्या वर्षी सुरुवातीला साखर उत्पादन कमी होईल, असे संस्थांकडून सांगितल्याने केंद्राने निर्यात बंदीबरोबर इथेनॉल उत्पादनावरही मर्यादा आणली.

याचा मोठा फटका साखर उद्योगाला बसला. यामुळे यंदा रोगाची शक्यता, तोडणीसाठी असलेल्या उसाची काटेकोर माहिती, पावसाचा अंदाज घेऊनच या वर्षीच्या उत्पादनाबाबत केंद्र सरकारला संभाव्‍य उत्पादनाचे आकडे ठोस सांगण्याचा आमचा प्रयत्‍न असल्याचे साखर उद्‍योगातील एका देश पातळीवरीस संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com