Textile Industry : जिनिंग-प्रेसिंग कारखान्यांची धडधड राज्यात मंदावली

जागतिक बाजारात कापसाबाबतची अनिश्चित स्थिती आणि अपेक्षित दरात बाजारात कापूस उपलब्ध होत नसल्याने राज्यातील जिनिंग-प्रेसिंग कारखानदारांनी सावध भूमिका घेतली आहे.
Textile Industry
Textile IndustryAgrowon

जळगाव : जागतिक बाजारात कापसाबाबतची (Cotton) अनिश्चित स्थिती आणि अपेक्षित दरात (Cotton Rate) बाजारात कापूस उपलब्ध होत नसल्याने राज्यातील जिनिंग-प्रेसिंग कारखानदारांनी (Ginning Pressing Factory) सावध भूमिका घेतली आहे. कारखाने फक्त निम्म्याच क्षमतेने सुरू आहेत. राज्यात रोज फक्त १५ ते १८ हजार कापूस गाठींची (Cotton Bales) (एक गाठ १७० किलो रुई) निर्मित होत आहे.

Textile Industry
Textile Industry : वस्त्रोद्योगाला खरेदीदरात कापूस पुरवू ः पाटील

कापसाची टंचाई निर्माण झाल्याचे कारखानदार सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांना सध्याचे कापूस दर परवडणारे नाहीत. कारण कापूस उत्पादनाला मोठा खर्च लागला आहे. खते, कीडनाशके, मजुरी, वाहतूक दर वाढले आहेत. त्यात गुलाबी बोंड अळी व अतिपावसातही नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना सध्याचे आठ हजार, साडे आठ हजार किंवा नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Textile Industry
Textile : वस्त्रोद्योगाच्या समस्यासंबधी नेमलेली समिती बरखास्त

खरेदीदार एकाच घरात, एकाच शेतातून आलेल्या कापसाला तीन दर देतात. कमी दर्जा (कवडी), उत्तम दर्जा, अधिक आर्द्रता (पिवळा, ओला) अशी विभागणी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, असाही मुद्दा शेतकरी अमोल चौधरी (हिवरखेडा, जि. जळगाव) मांडला.

कापूस व्यवसायात कारखानदारांनी मागील वेळेस मोठा नफा मिळविला. पण यंदा कारखानदार जागतिक बाजारातील रुईचे दर, चीनमधील अस्थिरता, रशिया - युक्रेनमधील संकट, मंदी असे मुद्दे उपस्थित करून कापूस खरेदी टाळत आहेत. परिणामी कारखान्यांतील उत्पादन कमी दिसत आहे.

राज्यात सुमारे ७८८ जिनिंग-प्रेसिंग कारखाने आहेत. यातील सुमारे ७५० कारखाने सुरू आहेत. सध्या रोज फक्त १५ ते १८ हजार कापूस गाठींची निर्मिती होत आहे. राज्यातील कारखान्यांना रोज किमान ३ लाख क्विंटल कापूस हवा आहे.

देशात मागील वर्षी नोव्हेंबरअखेर ८७ लाख गाठींची आवक झाली होती. यंदा नोव्हेंबरअखेर ४९ लाख गाठींची आवक झाली. राज्यात नोव्हेंबरअखेर सुमारे पाच लाख गाठींची आवक झाली. राज्यात ही आवक अत्यल्प आहे.

आठ हजार, साडे आठ हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात कापूस मिळत नाही. जागतिक बाजारात खंडीचे दर ६५ हजार रुपये आहेत. यानुसार आठ ते साडे आठ हजार रुपये दर दर्जानुसार देण्याची क्षमता आहे. कापूस मिळत नसल्याने कापूस गाठींचे उत्पादन घटले आहे.

- अरविंद जैन, संचालक, खानदेश जिनिंग-प्रेसिंग कारखानदार असोसिएशन.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com