Cabbage Rate : कांद्यापाठोपाठ कोबी उत्पादक अडचणीत

लेट खरीप कांद्याला बाजार समितीमध्ये एक ते दोन रुपये नीच्चांकी दर मिळत असताना कोबी पिकाच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.
Cabbage Rate
Cabbage RateAgrowon

Onion Market Rate नाशिक ः लेट खरीप कांद्याला (Onion Rate) बाजार समितीमध्ये एक ते दोन रुपये नीच्चांकी दर मिळत असताना कोबी पिकाच्या (Cabbage Rate) दरातही मोठी घसरण झाली आहे.

अवघा एक ते दोन रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण (Economy) पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच काढणीयोग्य (Cabbage Harvesting) तयार झालेल्या कोबी पिकावर शेतकऱ्याने नांगर फिरवला आहे.

शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. अशातच इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील शेतकरी अंबादास खैरे यांनी शेतात पिकविलेल्या कोबी पिकाला केवळ १ रुपया भाव मिळत असल्याने, तसेच ते पीक काढण्यासाठी काढणीचा खर्चदेखील परवडत नसल्याने ५ एकर क्षेत्रातील कोबी पिकावर ट्रॅक्टरच्या साह्याने नांगर फिरविला आहे.

Cabbage Rate
Vegetable Market : दर घसरल्याने पालेभाज्या फुकट वाटण्याची वेळ

खैरे यांनी कोबी लागवडीसाठी प्रति एकर ५० हजार रुपये खर्च केला आहे. एकूण पाच एकर कोबी लागवडीसाठी २.५० लाख रुपये खर्च झाला आहे.

मात्र कोबी पिकाला केवळ १ रुपया भाव मिळत असल्याने त्यांनी शासनाचा निषेध नोंदवीत आपल्या ५ एकर कोबी पिकावर नांगर फिरविला आहे.

तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर जातील, असा इशारा त्यांनी या वेळी दिला आहे.

Cabbage Rate
Onion Rate : कांदाप्रश्‍नी शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची ठिणगी

... तर सरकारला जागा दाखवून देऊ

राज्यातील कांदा, द्राक्ष यासह विविध शेतीमाल पिकविणार शेतकरी भाव नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहे.

ही अतिशय दु:खाची बाब आहे. शासनाला शेतकऱ्यांची दखल घ्यावीच लागणार आहे.

सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे. अन्यथा, शासनाला पळता भुई थोडी करू. जर शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ, असे अंबादास खैरे यांनी म्हटले आहे.

नाशिक बाजार समितीतील दरस्थिती :

दिनांक...आवक...किमान...कमाल...सरासरी

१ मार्च...५९२...२१०...४१५...२९०

२८ फेब्रु...१४५...१७०...३७५...२५०

२७ फेब्रु...५९२...१७०...३७५...२९०

२६ फेब्रु...७९७...२७०...४५५...३७५

२५ फेब्रु...५५४...१७०...४१५...३३०

२४ फेब्रु...४९९...२१०...४६०...२९०

२३ फेब्रु...४९४...१७०...५००...३३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com