Soybean Market: शेतकऱ्यांकडे अजून सोयाबीन शिल्लक? सोयापेंड निर्यात १० लाख टनांनी वाढली

Soymeal Export : देशातील बाजारात ३० जूनपर्यंत ९९ लाख टन सोयाबीन बाजारात आले. तर अजूनही शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया प्लांट्सकडे ५२ लाख टन सोयाबीन शिल्लक आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

Pune News : देशातील बाजारात ३० जूनपर्यंत ९९ लाख टन सोयाबीन बाजारात आले. तर अजूनही शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया प्लांट्सकडे ५२ लाख टन सोयाबीन शिल्लक आहे.

तसेच सोयापंडे निर्यातीत १० लाख टनांनी वाढ होऊन जवळपास १६ लाख टनांची निर्यात झाली. देशातील पशुखाद्यातील वापरही यंदा ३ लाख टनांनी वाढून ४७ लाख टनांवर पोचला, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने म्हटले आहे.

गेल्या हंगामात देशात एकूण १२० लाख ७२ हजार टन सोयाबीनचा पुरवठा होता. तर यंदा १४९ लाख टनांचा. म्हणजेच यंदा देशातील पुरवठा २८ लाख टनांनी वाढला. बियाणे म्हणून १३ लाख टन गृहीत धरल्यास आयात ५ लाख टनांसह यंदा गाळपासाठी १४१ लाख टन सोयाबीन येईल, असा अंदाज सोपाने व्यक्त केला. देशातील बाजारात ३० जूनपर्यंत ९९ लाख टन सोयाबीन आले होते. मागील हंगामातील आवकेपेक्षा यंदाची आवक २५ लाख टनांनी अधिक होती.

Soybean Market
Soybean Seed : नगर जिल्ह्यात सोयाबीन बियाणांचा तुटवडा

सोयाबीन गाळपही यंदा २२ लाख टनांनी अधिक राहीले. तर आतापर्यंत शेतकरी, व्यापारी, स्टॅकीस्ट आणि प्रक्रिया प्लांट्सकडे ५२ लाख टनांचा साठा असल्याचेही सोपाने स्पष्ट केले. जून महिन्यात बाजारात ८ लाख टन सोयाबीन विक्रीसाठी आले होते. गेल्यावर्षीच्या महिन्यातील आवकेपेक्षा यंदा ३ लाख टन अधिक आवक झाली होती.

सोयापेंडचा विचार करता, ३० जूनपर्यंत ६८ लाख टनांची निर्मिती झाली. गेल्यावर्षीपेक्षा यंदा तब्बल १८ लाख टनांनी सोयापेंड उत्पादन जास्त होते. तर अडीच लाख टनांचा मागील हंगामातील स्टॅक होता.

म्हणजेच यंदा जवळपास ७१ लाख टनांचा सोयापेंड पुरवठा झाला. त्यापैकी ३० जूनपर्यंत ७० लाख टनांचा वापर झाला. निर्यात, पशुखाद्य आणि मानवी आहारात यंदा सोयाबीनचा वापर जास्त झाला.

Soybean Market
Soybean Sowing : महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीत पिछाडीवर; देशात १८ टक्क्यांनी घट

सोयापेंड निर्यात यंदा जवळपास १६ लाख टनांवर पोचली. मागील हंगामातील निर्यात जवळपास ६ लाख टन होती. तर मानवी आहारातील वापर ६ लाख ७५ हजार टनांवर झाला. देशातील पुशखाद्यातील वापर ४७ लाख टन झाला.

यंदा देशातील सोयापेंड वापर वाढला. निर्यातही जवळपास तीन पटींपर्यंत वाढली. जून महिन्यातही देशातून ५० हजार टनांची निर्यात झाली होती. यापुढेही निर्यात सुरु राहण्याचा अंदाज आहे.

दुसरीकडे देशातील सोयाबीन लागवड आतापर्यंत कमी दिसते. महत्वाच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पाऊस कमी असल्याने लागवडीची कमी आहे. सोयाबीन लागवडीचा काळाही आता संपत आहे.

त्यामुळे यंदा देशातील सोयीबन लागवड कमी राहण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे पुढील काळात देशातील सोयाबीन लागवड, पाऊसमान आणि पिकाची स्थिती यावरून बाजार बदलू शकतो, असे अभ्यासकांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com