
Latur News : कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाचही जिल्ह्यांतील रब्बीच्या पेरण्या आता शंभर टक्के पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंत ९९.८८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात १३५ टक्के पेरण्या झाल्या असून, लातूर जिल्ह्यात १०८ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात ९१.८५ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यात ८९ टक्के तर परभणी जिल्ह्यात पेरणा टक्का ८२ आहे. पेरणी झालेली पिकांची चांगली उगवण झाली असून, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. दरम्यान यंदा हरभराच्या पेरणी क्षेत्रात भरीव वाढ झाली असून साडेनऊ लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
रब्बी ज्वारीवर काही भागात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. आतापर्यंत पाच जिल्ह्यात १३ लाख ६३ हजार ९६० पैकी तेरा लाख ६२ हजार ३१३ हेक्टरवर (९९.८८ टक्के) रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. हरभऱ्याची सात लाख ८६ हजार १२४ पैकी नऊ लाख ५२२ (११६ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली असून हरभरा उगवणीच्या स्थितीत आहेत.
रब्बी ज्वारी पिकांवर काही भागात अजूनही लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकांवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून काही भागात मररोगाने पिकांवर संकट निर्माण केले आहे. इतर कडधान्यांच्या क्षेत्रात यंदा मोठी वाढ झाली असून एक हजार ८९० हेक्टर क्षेत्र असताना इतर कडधान्याची पेरणी दहा हजार ४०४ हेक्टरवर (५५० टक्के) पेरणी झाली आहे.
कृषी विभागाने दिलेल्या साप्ताहिक अहवालांनुसार मागील आठवड्यात पाचही जिल्ह्यात हवामान थंड व ढगाळ होते. काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या. याचा फटका रब्बी पिकांना बसला असून रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. खरिपातील तुरीचे पीक सध्या फुलोऱ्यात व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून काही भागात तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापूस वेचणी सध्या अंतिम टप्प्यात असून वेचणीचे काम ८५ टक्क्याच्या पुढे आहे.
आतापर्यंत रब्बी ज्वारीची सर्वसाधारण तीन लाख ७१ हजार ८५७ पैकी दोन लाख ६६ हजार ६७७ हेक्टरवर (८० टक्के) पेरणी झालेली आहे. ज्वारी सध्या रोप अवस्थेत आहे. गव्हाच्या पेरणीला यंदा कमी प्राधान्य असले तरी विभागातील एक लाख ६५ हजार १९ पैकी एक लाख ५५० (६४ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली असून हे पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.
हरभऱ्याची सात लाख ८६ हजार १२४ पैकी नऊ लाख ५२२ (११६ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली असून हरभरा उगवणीच्या स्थितीत आहेत. तेलबियामध्ये सर्वाधिक करडईची १९ हजार ५३१ पैकी १९ हजार ३८५ (१२६ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभरानंतर शेतकऱ्यांनी करडईलाही यंदा मागील हंगामाप्रमाणेच पसंती दिली आहे. दरम्यान परभणी व धाराशिव जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्यांना या आठवड्यात वेग मिळण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.