Ginger Price: आले पिकास गाडीला सात हजार रुपये

Ginger Farming Loss: सातारा जिल्ह्यात आले पिकाचे दर घसरत असून एका महिन्यात गाडीमागे (५०० किलो) तब्बल दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचा आले काढणीकडे कल वाढला आहे.
Ginger
GingerAgrowon
Published on
Updated on

Satara News: आलेपीक दराच्या घसरणीचे ग्रहण सुरू असून, एक महिन्यात गाडीमागे (५०० किलो) तब्बल दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. सध्या आले पिकास गाडीला (५०० किलो) सात ते साडेसात हजार रुपये दर मिळत आहे. पुढील काळात दरात घसरण होईल तसेच पाणी टंचाईमुळे आले काढणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

मागील तीन ते चार वर्षांत दरात शाश्‍वत असलेल्या आले पीकदरातील घसरणीमुळे बेभरवशी झाले आहे. मागील वर्षीच्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांपासून दरात सुरू झालेली घसरण अजूनही सुरू आहे.

Ginger
Ginger Processing: आल्यापासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस आले पिकांस नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिगाडी दर मिळाला होता. मात्र एक महिन्यात पुन्हा दोन हजार रुपयांनी दरात घसरण झाली आहे. सध्या आल्यास प्रतिगाडी सात ते साडेसात हजार रुपये दर मिळत आहे. हा दर गेल्या पंधरा दिवसांपासून टिकून आहे. पुढील काळात दरात घसरण होईल तसेच पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी आले काढणीवर भर दिला आहे.

Ginger
Ginger Seed : आले बियाणे खरेदी अंतिम टप्यात

दरातील अस्थिरतेमुळे व्यापाऱ्यांकडून आले खरेदी संथगतीने सुरू आहे. मुळकूज तसेच जास्त पाऊस यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. एकरी नऊ ते दहा टन सरासरी उत्पादन मिळत आहे.

यामुळे सध्या मिळत असलेला दर व उत्पादन यांचा मेळ बसत नसल्याने भांडवली खर्च निघत नाही. यामुळे आले उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे. मागील तीन ते चार वर्षे आले पिकास दर चांगला राहिल्याने शेतकऱ्यांना आधार झाला होता. बियाणे खरेदी कमी झाल्याने या वर्षी क्षेत्रातही घट होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com