Pomegranate Export
Pomegranate ExportAgrowon

Pomegranate Export : अमेरिकेला डाळिंबाची निर्यात सुरू

Export of Pomegranate : पाच वर्षांपूर्वी डाळिंबामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव आढळल्याने अमेरिकेला बंद असलेली डाळिंबाची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे.
Published on

Pune News : पाच वर्षांपूर्वी डाळिंबामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव आढळल्याने अमेरिकेला बंद असलेली डाळिंबाची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून विकिरण प्रक्रिया करून, १४ टन डाळिंबाची यशस्वी निर्यात झाली आहे.

निर्यातीबाबतची माहिती देताना पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम म्हणाले, की फळमाशीच्या प्रादुर्भाव आढळल्यामुळे अमेरिकेने भारतातून डाळिंब आयात करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे गेली ५-६ वर्षे अमेरिकेस डाळिंब निर्यात होऊ शकली नव्हती. ही बंदी उठविण्याबाबत अपेडा व एन.पी.पी.ओ. भारत सरकार यांनी संयुक्तरित्या अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून ही निर्यात बंदी उठवावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

Pomegranate Export
Pomegranate Export : अमेरिकेतील डाळिंब निर्यात पुन्हा सुरू

त्यानुसार २०२२ पासून अमेरिकेने निर्यात बंदी उठवली, मात्र त्यासाठी त्यांनी काही नियम व अटी घातल्या होत्या. यामध्ये माईट वॉश, सोडीयम हायपोक्लोराईड प्रक्रिया, वॉशिंग-ड्राईंग इ. प्रक्रिया करून त्यांनी निश्चित केलेल्या मानांकानुसारच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव आला. त्यानुसार निर्यातदारांसोबत निर्यातीचे नियोजन करण्यात आले होते.

नव्या नियमावलीनुसार चाचणीसाठी जुलै २०२३ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर डाळिंबाची पहिली शिपमेंट विमानमार्गे पणन मंडळाच्या वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रावरून पाठविण्यात आली होती. या शिपमेंटच्या यशस्वी निर्यातीनंतर अमेरिकेचे निरीक्षक डॉ. लुईस पणन मंडळाच्या वाशी विकिरण सुविधेची तपासणी आणि चाचण्यांसाठी आले.

जानेवारी ते मार्च २०२४ या हंगामासाठी या चाचण्या होणार असून, पहिल्या समुद्रमार्गे डाळिंब कंटेनरसाठी चाचण्या आणि पॅकिंग करण्यात आले. यामध्ये डाळिंबाची विविध पातळ्यांवर प्रतवारी करून, ४ किलोच्या बॉक्समध्ये भरून त्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. ४ हजार २५८ बॉक्समधून १४ टन डाळिंब खेप समुद्रमार्गे अमेरिकेच्या नेवार्क या पोर्टसाठी बुधवारी (ता. २८) नाव्हा शेवा बंदरावरून रवाना झाली.

Pomegranate Export
Pomegranate Export : पाच वर्षांनंतर अमेरिकेत डाळिंब निर्यात सुरू

या वेळी भारत सरकारचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, संजय कदम, अपेडाच्या महासंचालक विनीता सुधांशु; अपेडा मुंबईचे उपसरव्यवस्थापक प्रशांत वाघमारे, अमेरिका दूतावासाचे श्री. मायकेल श्रुडर, श्रीमती एल्म्स रायनॉन आदी उपस्थित होते.

भारतीय डाळिंबाला अमेरिकेत विशेष मागणी आहे. काही दिवसांपूर्वी बंदी असलेली निर्यात आता विशेष प्रोटोकॉलनुसार सुरू झाली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी असल्याने अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय डाळिंबाचा मोठा हिस्सा असणार आहे. यासाठी अपेडा, एन.पी.पी.ओ. पणन मंडळ आणि निर्यातदारांच्या आणि अमेरिका सरकारच्या सहकार्याने महत्त्वाची पावले टाकली जात आहेत.
राजेश अग्रवाल, भारत सरकारचे अतिरिक्त सचिव
अमेरिकेस भारतातून पहिल्यांदाच समुद्रमार्गे डाळिंबाचा कंटेनर निर्यात करण्यात आल्याने ही एक महत्त्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली असून भारतीय डाळिंबांनी अत्यंत शाश्वत व मोठी अशी अमेरिकन बाजारपेठ काबीज केली जात असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
संजय कदम, कार्यकारी संचालक, पणन मंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com