Rabi Sowing : हरभरा, करडई, ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रवाढीचा अंदाज

यंदा जिल्ह्यात सरासरीच्या १३० टक्के झालेल्या पावसामुळे मोठे, मध्यम, लघू तसेच उच्च पातळी बंधाऱ्यांत उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

नांदेड : यंदा जिल्ह्यात सरासरीच्या १३० टक्के झालेल्या पावसामुळे मोठे, मध्यम, लघू तसेच उच्च पातळी बंधाऱ्यांत उपयुक्त पाणीसाठा (Water Storage) झाला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतील ओलावा कायम आहे. त्यामुळे शेतकरी रब्बीच्या पेरणीत (Rabi Sowing) व्यस्त आहेत. जिल्ह्यात सध्या हरभरा (Chana Sowing), रब्बी ज्वारी (Rabi Jowar) व करडईची पेरणी (Safflower Sowing) होत आहे. आजपर्यंत ८६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा हरभरा, करडई, ज्वारीसह गव्हाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी तसेच परतीच्या जोरदार पावसाने सव्वापाच लाख हेक्टरवरील खरिपासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक होते. वार्षिक सरासरीच्या तुलनेत या वर्षी १३० टक्के पावसाची नोंद झाली असल्याने रब्बी हंगाम मात्र जोरात येण्याची शक्यता आहे. कृषी विभागानेही रब्बीसाठी लागणाऱ्या बियाणे तसेच खतांचे नियोजन केले आहे.

Kharif Sowing
Rabi Sowing : अकोला जिल्ह्यात रब्बीसाठी तयार झाले पोषक वातावरण

खरिपात पावसामुळे झालेले नुकसान भरून निघावे, या साठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रब्बी पिकाखालील क्षेत्र या वर्षी वाढविण्यासाठी बैठका घेऊन नियोजन केले आहे. जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख २४ हजार ६३४ हेक्टर आहे. परंतु यंदा चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणीचा अंदाज व्यक्त केला आहे.

Kharif Sowing
Rabi Sowing : खानदेशात रब्बीची पेरणी वेगात

यात हरभरा पिकाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ५३ हजार हेक्टर आहे. आजवर ८० हजार हेक्टरवर हरभरा पेरला आहे. तसेच गहू ७३८ हेक्टर, करडई ११०४ हेक्टर, रब्बी ज्वारी ४७०२ हेक्टर असे एकूण ८६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

करडईच्या क्षेत्रवाढीचा अंदाज

यंदा करडईचेही क्षेत्र वाढेल, असा अंदाज आहे. कृषी विभागाकडून हरभरा, करडईचे पिकाचे अनुदानित बियाणेवाटप केले आहे. प्रमाणित बियाणेही सवलतीच्या दरात उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात नांदेड, नायगाव, अर्धापूर, मुदखेड, उमरी, बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव या तालुक्यांत रब्बी पेरणीला सुरुवात झाली आहे. देगलूर तालुक्यात शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने हरभरा पेरणी करत आहेत.

जिल्ह्यात रब्बीसाठी पूर्वमशागत झालेल्या ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली आहे. यंदा हरभरा, करडई, रब्बी ज्वारी तसेच गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com