Marigold Harvesting : दसऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर झेंडू काढणीस वेग

Marigold Farming : गेल्‍या चार दिवसांत सर्वच फुलांच्या दरात मोठी तेजी असताना फूल उत्पादकांना मात्र सततच्या पावसाचा फूल काढणीत अडथळा येत आहे.
Marigold
Marigold Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : गेल्‍या चार दिवसांत सर्वच फुलांच्या दरात मोठी तेजी असताना फूल उत्पादकांना मात्र सततच्या पावसाचा फूल काढणीत अडथळा येत आहे. अनेक शिवारांमध्ये पावसाने पाणी साचल्याने फूल काढणीत अडथळे आले.

फुले भिजल्याने दर्जाचाही प्रश्न निर्माण होऊन झेंडूचे दर ५० ते ६० रुपयापर्यंत कमी झाले. बाजारपेठेत झेंडूचा दर सातत्याने किलोस १०० ते १२५ रुपयांच्या आसपास राहिला. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्या भागातील फूल उत्पादकांना मात्र गेल्या चार दिवसांत झेंडू फुलाला ८० ते १०० रुपये किलोपर्यंत मुंबईसह अन्य बाजारपेठेत दर मिळाला.

Marigold
Marigold Flower Rate : नगरमध्ये झेंडूला प्रथमच पंधरा हजारांपर्यंत दर

खंडेनवमी व दसऱ्यासाठी विशेष करून झेंडूची मागणी असते. वाहनांच्या, दुकानांच्या पूजेसाठी फुलांची गरज असल्याने या दोन दिवसांत झेंडू फुलांची मागणी वाढते. आठ दिवसांत वेगवेगळया ठिकाणी दररोज पाऊस पडत आहे. यामुळे तोडणी अशक्य होत आहे.

फुले काढताना पाऊस झाल्यास ती बाजारपेठेत आणेपर्यंत खराब होत असल्याने अनेक ठिकाणी पावसाचा रागरंग पाहूनच फुलांची काढणी होत आहे. दुपारनंतर पाऊस सुरू होत असल्याने अनेक फूल उत्पादक सकाळी लवकर फुले काढून ती बाजारात आणण्यासाठी धडपडत आहेत.

दर वाढत असताना गेल्या दोन दिवसांत पाऊस झाल्याने उत्साहाची जागा निराशेने घेतली. शनिवारी (ता. १२) खंडेनवमी व दसरा एकाच दिवशी येत असल्याने बहुतांश झेंडू उत्पादकांनी सकाळपासूनच झेंडूची तोडणी सुरू केली होती.

Marigold
Marigolds Flower : कोल्हापुरात झेंडू दरात तेजी, फूल उत्पादक शेतकरी समाधानी, इतर फुलांचे दरही वाढले

पावसामुळे मात्र शेतकऱ्यांना जागेवर मिळणाऱ्या दरात गेल्‍या दोन दिवसांच्या तुलनेत किलोस ३० ते ४० रुपयापर्यंत घट झाल्याचे चिपरी (ता. शिरोळ) येथील शेतकरी रमेश पांडव यांनी सांगितले.

यंदा अतिपावसाने व पुराने झेंडूचे प्लॉट गेल्याने गणेशोत्सवानंतर दर घसरले नाहीत. नवरात्रीनंतर सातत्याने मागणी वाढत असल्याने यंदाच्या नवरात्रीत काही ठिकाणी पावसाचा अडथळा वगळता ज्यांच्या झेंडूची प्रत चांगली आहे त्यांना दर समाधानकारक मिळाल्याने पांडव यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com