India Sugar Supply and Demand 2026: गेल्या काही दिवसांत झालेल्या साखर दराच्या घसरणीनंतर देशांतर्गत साखर बाजारात व्यवहार सध्या स्थिर झाले आहेत. १९ सप्टेंबरच्या बाजारस्थितीनुसार कोल्हापूरमध्ये एस-ग्रेड साखरेचा व्यवहार ४३२० ते ४३८० रुपये प्रति क्विंटल, तर उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर बाजारात एम-ग्रेड साखरेचा दर ४५०० ते ४६०० रुपये प्रति क्विंटल राहिला. महाराष्ट्राचा एक्स-मिल एस-३० दर ४३०० रुपये, तर एम-३० दर ४४०० रुपये प्रति क्विंटल नोंदविण्यात आला..अतिरिक्त १३.५० लाख टनांचा परिणामसप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी केंद्राने १३.५० लाख टन साखर विक्री कोटा निश्चित केला आहे. महिन्याच्या उर्वरित कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर बाजारात उपलब्ध होणार असल्याने पुरवठ्याची बाजू मजबूत राहणार आहे. साखर बाजारात दर ठरविताना केवळ उत्पादन खर्च किंवा मागणी महत्त्वाची नसते;.Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्चित .सरकारी कोटा, कारखान्यांकडील उपलब्ध साठा, व्यापाऱ्यांची खरेदीची क्षमता, सणासुदीची मागणी आणि पुढील गाळप हंगामाचा अंदाज हे सर्व घटक एकत्रित परिणाम करतात. सध्या यातील पुरवठ्याची बाजू मजबूत असल्याने बाजारात तेजी तातडीने येण्याची शक्यता कमी असल्याचे सुत्रांनी सांगितले..महाराष्ट्रातील एक्स-मिल एस-३०चा दर ४३०० रुपये आणि एम-३०चा ४,४०० रुपये प्रति क्विंटल आहे. याचवेळी दक्षिण कर्नाटकात एस-३० ४५०० ते ४६००, तर एम-३० ४५५० ते ४६५० रुपये आहे. उत्तर प्रदेशात एम-३०चा दर ४५०० ते ४,६०० रुपये आहे. गुजरातमध्ये एस-३० ४७६१ आणि एम-३० ४८६१ रुपये, तर तमिळनाडूत एस-३० ४५०० ते ५००० आणि एम-३० ४६३५ ते ४७५० रुपये प्रति क्विंटल आहे. मध्य प्रदेशात एस-३० ४४९५ आणि एम-३० ४५४५ रुपये, तर पंजाबमध्ये एम-३० ४६३१ ते ४७८१ रुपये प्रति क्विंटल आहे.व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्याऐवजी गरजेनुसार खरेदी करण्याची प्रवृत्ती दिसत आहे. .Sugar Industry: साखर उद्योगाला अल्प दिलासा.दुसरीकडे, कारखान्यांसमोरही विक्री आणि रोख प्रवाहाचे नियोजन महत्त्वाचे ठरत आहे. आता साखरेच्या बाजारासाठी सप्टेंबरअखेरचा सरकारी कोटा आणि ऑक्टोबरमधील विक्री धोरण महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर आगामी गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णयाचा बाजाराच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. लवकर गाळप सुरू झाल्यास नवीन साखर बाजारात येण्याची अपेक्षा निर्माण होईल. मात्र, प्रत्यक्ष उत्पादन, साखर उतारा आणि सुरुवातीच्या काळातील उत्पादनाचे प्रमाण यावर त्याचा परिणाम अवलंबून राहील अशी स्थिती आहे..पंधरवडा कोट्यामुळे उलथापालथ नाहीसाखर उद्योगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये देशांतर्गत बाजारासाठी केंद्राने २२.५० लाख टनांचा मासिक कोटा निश्चित केला होता. त्या काळात साखरेच्या दरांनी तुलनेने मजबूत पातळी गाठली. मात्र सप्टेंबरमध्ये सरकारने मासिक कोट्याऐवजी पंधरवड्याच्या आधारावर विक्रीचे नियोजन केले. १ ते १५ सप्टेंबरसाठी १३ लाख टन, तर १६ ते ३० सप्टेंबरसाठी आणखी १३.५० लाख टन साखर विक्री कोटा निश्चित करण्यात आला..सप्टेंबरमध्ये एकूण २६.५० लाख टनांचा कोटा बाजारासाठी उपलब्ध झाला. ऑगस्टच्या २२.५० लाख टनांच्या तुलनेत सप्टेंबरचा हा एकूण कोटा सुमारे चार लाख टनांनी अधिक आहे. याचा थेट परिणाम बाजारातील पुरवठ्यावर झाला. कारखाने, व्यापारी आणि घाऊक खरेदीदार यांच्यातील व्यवहारात ‘माल उपलब्ध राहणार’ हा विश्वास वाढला. परिणामी, भविष्यात दर वाढतील या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात साठा करण्याची गरज कमी झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.