Banana Mosaic : केळीवरील कुकुंबर मोझॅक रोगाचे नियंत्रण

Banana Crop Protection : केळी बागांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. रोग नियंत्रणासाठी गाव पातळीवर एकत्रितरीत्या मोहीम राबविणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून प्रभावी रोगनियंत्रण शक्य होईल.
Banana Cucumber Mosaic
Banana Cucumber Mosaic Agrowon
Published on
Updated on

डॉ. गणेश देशमुख, डॉ. चंद्रशेखर पुजारी, प्रा. अंजली मेंढे, डॉ. प्राजक्ता वाघ

Banana Crop Management : मागील काही वर्षांपासून केळी लागवड क्षेत्रामध्ये कुकुंबर मोझॅक (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्थानिक भाषेत या रोगास ‘हरण्या’ रोग असे म्हणतात. हा विषाणूजन्य रोग असून याच्या नियंत्रणासाठी थेट उपाय नाहीत.

या रोगाचा प्रसार मावा किडीमार्फत होतो. या रोगाची सुमारे ९०० पेक्षा अधिक यजमान विके आहे. त्यामुळे या पिकांची केळी लागवड क्षेत्राच्या जवळ लागवड असल्यास रोगाची तीव्रता अधिक वाढते.

या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुलै व ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या केळी बागांमध्ये अधिक दिसून येतो. मे व जून लागवडीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. सद्यःस्थितीचा विचार केल्यास मे-जून लागवडीमध्ये काही ठिकाणी अगदी नगण्य प्रादुर्भाव आहे.

मात्र उशिराने लागवड केलेल्या (जुलै-ऑगस्ट) बागांमध्ये प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार मुख्यतः मावा किडीमार्फत होत असल्याने कीड नियंत्रणावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होईल.

Banana Cucumber Mosaic
Banana Cucumber Mosaic : ‘कुकुंबर मोझॅक’मुळे केळी बागा काढून फेकल्या

लक्षणे ः

- सुरुवातीस कोवळ्या पानांच्या शिरांतील हरितद्रव्य लोप पावते. त्यामुळे पानांवर पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे अर्धवट आकाराचे किंवा संपूर्ण पानांवर आढळून येतात.

- कालांतराने पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून तेथील उती मृत पावतात.

- पाने फाटतात, पानांचा पृष्ठभाग आकसतो. कडा वाकड्या होऊन पाने जवळ येतात.

- शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते.

- रोगाच्या अति तीव्र अवस्थेत पोंग्याजवळील पाने पिवळे पडून पोंगा सडतो. झाडाची वाढ खुंटते.

अनुकूल घटक ः

- सततचा पाऊस, ढगाळ वातावरण.

- कमी झालेले तापमान व वाढलेली आर्द्रता.

- रोगग्रस्त लागवड साहित्याचा वापर.

- केळी लागवड परिसरात काकडीवर्गीय पिके, टोमॅटो, मिरची, वांगी, चवळी, सोयाबीन, मूग, मटकी या पिकांची लागवड.

- तणांचा प्रादुर्भाव

- पीक फेरपालटीचा अभाव.

Banana Cucumber Mosaic
Banana Cucumber Mosaic : दुष्टचक्र ‘सीएमव्ही’चे

व्यवस्थापन ः

विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय करता येत नाही. तथापि रोगप्रसार रोखण्यासाठी खालील उपाययोजनांचा अवलंब करावा.

- प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून बागेपासून दूरवर नेऊन जाळून नष्ट करावीत.

- बागेचे दर ४ ते ५ दिवसांनी २ ते ३ वेळा निरीक्षण करावे.

- बागेतील तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता राखावी. बागेत चिवईची भाजी ठेवू नये.

- केळी बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी या पिकांची लागवड करू नये.

कीड नियंत्रण ः

रोगाचा प्रसार मावा किडीमार्फत होतो. कीड नियंत्रणासाठी,

(फवारणी ः प्रति लिटर पाणी)

डायमेथोएट (३० ईसी) २ मिलि किंवा

थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा

इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिलि

(ॲग्रेस्को शिफारस आहेत.)

- डॉ. गणेश देशमुख, ९४२२०२१०१६

(अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com