Soybean Market Rate: मका, मूग, सोयाबीनच्या आवकेत घट

Soybean Bajarbhav : डिसेंबर महिन्यात कापसाची आवक वाढत्या पातळीवर स्थिर राहिली. मक्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली. मूग व सोयाबीन यांचीही आवक घसरत होती.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon

Soybean Market Update : १ जानेवारीपासून NCDEX मध्ये मक्याचे मे २०२३ डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू झाले. त्यामुळे आता NCDEX मध्ये मक्याचे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलिव्हरीसाठी आणि हळदीचे एप्रिल, मे व जून डिलिव्हरीसाठी व्यवहार चालू आहेत. MCX मध्ये कपाशीचे फेब्रुवारी, एप्रिल व नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी व्यवहार चालू आहेत. हरभरा, मूग, सोयाबीन व तूर यांचे फ्यूचर्स व्यवहार २०२३ या वर्षामध्ये बंद असतील.

पाम तेल (Palm Oil), उडीद (Urad) व तूर (Tur) यांच्या मुक्त आयातीचे धोरण (Import Policy) ३१ डिसेंबरनंतर सुद्धा चालू राहील. त्याचा परिणाम काही अंशी सोयाबीनसह (Soybean Rate) इतर खाद्यतेलाच्या किमतींवर होईल.

डिसेंबर महिन्यात कापसाची आवक (Cotton Arrival) वाढत्या पातळीवर स्थिर राहिली. मक्याची आवक (Maize Arrival) मोठ्या प्रमाणात घसरली. मूग व सोयाबीन यांचीही आवक (Soybean Arrival) घसरत होती. तुरीची आवक आता वाढू लागली आहे. या महिन्यात ती वाढती असेल. हरभरा, कांदा व टोमॅटो यांची आवक स्थिर राहिली.

डिसेंबर महिन्यात कापसाचे भाव कमी होत होते. मक्यात वाढीचा कल टिकून राहिला. मुगाचा हंगाम संपला आहे. त्यामुळे मुगाची किंमत वाढत आहे. हळदीच्या किमतीसुद्धा डिसेंबर मध्यापासून वाढत आहेत. सोयाबीन, तूर, कांदा व टोमॅटो यांच्या किमती स्थिर होत्या.

Soybean Rate
Soybean, Maize Crop Update : उन्हाळी भुईमूग व मका रोप अवस्थेत, तर सोयाबीन फुलोऱ्यात

या सप्ताहामधील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) डिसेंबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव २.४ टक्क्यांनी घसरून रु. २९,०४० वर आले होते; या सप्ताहात मात्र ते ४.९ टक्क्यांनी वाढून रु. ३०,४६० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा (प्रति २० किलो) ४.६ टक्क्यांनी वाढून रु १,६७३ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.

मका

मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती ०.६ टक्क्याने वाढून रु. २,२०५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या किंचित (०.२ टक्क्याने) घसरून रु. २,२०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (फेब्रुवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२१९ वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती रु. २,२३१ वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.

Soybean Rate
Tur Market : हिंगोलीत तुरीला कमाल ८ हजार ८९० रुपये दर

हळद

हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात मात्र त्या ०.८ टक्क्याने घसरून रु. ७,४०१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्याने घसरून रु. ७,३३५ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,८२८ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ७,८४८ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु. ४,९४७ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. ५,०४८ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.

Soybean Rate
Cotton Market : कापूस उत्पादनात मोठी घट; तरीही मे महिन्यात भाव का नाही?

मूग

मुगाच्या किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) या सप्ताहात रु. ७,५०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) रु. ५,७५७ वर आली होती; या सप्ताहात ती ०.४ टक्क्याने वाढून रु. ५,७८१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) या सप्ताहात १.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,०३३ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याच्या किमती १६ डिसेंबरपासून स्थिर आहेत. गेल्या सप्ताहात किंमत (पिंपळगाव) रु. १,३०० होती; या सप्ताहात ती याच पातळीवर आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ५०० वर आली होती. या सप्ताहात ती रु. ५७५ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी

ब-६, कलाबसंत सोसायटी, १५वी गल्ली, भांडारकर रस्ता, पुणे ४११००४; फोन : ९४२०१७७३४८ arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com