Cotton Market : कापूस उत्पादनात मोठी घट; तरीही मे महिन्यात भाव का नाही?

Kapus Bajarbhav : उत्पादन कमी होऊनही दर दबावात असल्याचं पहिल्यांदाचं घडताना दिसतंय. यंदा मे महिन्यातही कापूस आवक मोठ्या प्रमाणात होतेय. मागीलवर्षी मे महिन्यात होती त्या आवकेच्या तुलनेत सध्याची आवक पाच पटीनं जास्त आहे.
Cotton Market
Cotton Market Agrowon

Cotton Rate Update : उत्पादन कमी होऊनही दर दबावात असल्याचं पहिल्यांदाचं घडताना दिसतंय. यंदा मे महिन्यातही कापूस आवक (Cotton Arrival) मोठ्या प्रमाणात होतेय. मागीलवर्षी मे महिन्यात होती त्या आवकेच्या तुलनेत सध्याची आवक पाच पटीनं जास्त आहे.

तर दुसरीकडं तोट्यात असल्याचं उद्योगांचं रडगाणही कायम आहे. विशेष म्हणजे यंदा उत्पादन कमी होऊन आणि कापूस आवकेचा सात महिने होऊनही भाव दबावात आहेत.

चालू हंगामात कापूस बाजारात अनपेक्षित घटना घडतायेत. एरवी मार्चपर्यंत कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांनी माल माग ठेवला. त्यामुळं मार्चपर्यंत भाव दबावात राहून नंतरच्या काळात दरात तेजी येत होती. पण यंदा मार्चपर्यंत बाजारातील आवक मर्यादीत होती. परिणामी दरही टिकून होते. पण मार्चपासून आवक वाढत गेली.

हंगामातील उचांकी आवक मार्च महिन्यापासूनच सुरु झाली. याचा दबाव दरावर आला. शेतकरी कापूस विकत असल्यानं देशातील बाजारावर दबाव आहे. जागतिक कापूस बाजारात भारताचं महत्वाचं स्थान आहे. भारतात दर घटल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही दिसत असल्याची चर्चा आहे. पण सध्या आवक जास्त असल्यानंच भाव दबावात दिसतो.

Cotton Market
Cotton Market: कापूस बाजारावर दबाव का वाढला?

गेल्यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापसाची आवक रोज २० हजार गाठींपेक्षाही कमी होती. कापसाचे भाव १० हजारांच्या दरम्यान असतानाही कापूस नव्हता. पण यंदा सध्याची बाजारातील आवक १ लाख १० हजार गाठींच्या दरम्यान आहे. म्हणजेच यंदाची बाजाराची आवक पाच ते सहा पच अधिक आहे.

कापसाची आवक अधिक असल्यानेच सध्या दर दबावात दिसतात. शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळात कापूस मागं ठेवला. पण मार्चपासून विक्री वाढवली. मागील हंगामात याच काळात कापूस दरात मोठी तेजी होती.

भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआयच्या माहितीनुसार २ मे पर्यंत देशातील बाजारात २४१ लाख गाठी कापूस आला. तर काही संस्थांच्या मते बाजारातील आवक २३५ ते २४० लाख गाठींच्या दरम्यान कापूस आला. गेल्या हंगामात याच काळातील आवक २६५ लाख गाठींच्या दरम्यान होती. दोन्ही वर्षातील आवकेची तुलना केल्यास आवकेतील तफावत ३० हजारांपेक्षाही कमी झाली. म्हणजेच गेल्या हंगामातील आवकेपर्यंत आकडा पोचतोय.

सध्या महाराष्ट्रासह इतरही राज्यांमधील कापूस भागांमध्ये पाऊस पडतोय. यामुळं शेतकऱ्यांना कापूस साठविण्याच्या आडचणीत वाढ झाली. काही ठिकाणी पावसात कापूस ओला झाल्याचेही वृत्त आहे.

सुरु असलेला पाऊस आणि खरिपाच्या तयारीसाठी शेतकरी कापूस विकत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं सध्या बाजारातील आवक जास्त दिसते. त्यामुळं दरावरील दबाव वाढला. सध्या हंगामातील निचांकी भाव दिसतोय.

बाजारात कापसाला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार १०० रुपयांचा भाव मिळतोय. ही सरासरी भावपातळी यंदाच्या हंगामातील सर्वात कमी आहे. तीही मे महिन्यात मिळतेय. वायद्यांमध्ये सध्या खंडीचे भाव कमी होऊन वायदे ६३ हजार ४० रुपयांपर्यंत आले.

Cotton Market
Cotton Market : कापूस बाजारावर खरचं आवकेचा दबाव आहे का?

बाजारात कापूस नरमल्यानं शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली. वास्तविक एप्रिलच्या मध्यानंतर कापूस दरात सुधारणा होण्याची अपेक्षा होती. बाजारात तशी स्थितीही दिसत होती. पण शेतकऱ्यांची कापूस विक्री वाढल्याचं कारण देऊन बाजारावर दबाव आल्याचं सांगितलं जातं.

देशात यंदा ३०३ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. सीसीआयच्या मते २४१ लाख गाठी कापूस बाजारात आला. म्हणजेच आता केवळ ६२ लाख गाठीच कापूस बाजारात यायचाय. स्पष्ट आहे की हा सर्व कापूस शेतकऱ्यांकडं नाही. शेतकऱ्यांकडे आता १० ते १५ टक्केच कापूस असू शकतो, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

बाकीचा कापूस व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि जिनिंगकडे आहे. म्हणजेच शेतकऱ्यांकडील कापसाची आवक पुढील १५ ते २० दिवसांमध्ये पूर्ण होईल. ज्या शेतकऱ्यांना कापूस विकायचा आहे, ते या काळात विकतील. त्यानंतर आवक कमी होत जाईल.

कापसाची आवक कमी जाल्यानंतर दरात वाढ झाल्याचं आपण दरवर्षी पाहत असतो. ते यंदाही होऊ शकतं. त्यामुळं ज्यांना शक्य आहे, कापूस साठवण्याची व्यवस्था आहे त्यांनी थांबण्यास हरकत नाही. पण बाजाराकडं लक्ष ठेऊन असावं.

शेतकऱ्यांकडं कापूस असतो, तोपर्यंत सर्व उद्योग तोट्यात असतात. पण शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येऊन गेल्यानंतर तेजी येते. त्याचा अनुभव आपल्याला दरवर्षी येतो. यंदाही असचं होतं का ते पाहावं लागेल.

की खरचं उद्योग अडचणीत आहेत आणि सूत आणि कापडाला मागणी नाही, हे पुढच्या काही दिवसांमध्ये कळेलच. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बाॅक्समध्ये नक्की कळवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com