Milk Rate : दुधाच्या पुरवठ्यात घट; दरवाढीचे संकेत

राज्यातील दुधाच्या उत्पादनात घट होते आहे. एकूण उत्पादन येत्या काही महिन्यांमध्ये १० ते १५ लाख लिटरने घटण्याची शक्यता आहे.
Milk Rate
Milk RateAgrowon

पुणे ः राज्यातील दुधाच्या उत्पादनात (Milk Production) घट होते आहे. एकूण उत्पादन येत्या काही महिन्यांमध्ये १० ते १५ लाख लिटरने घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुधाच्या विक्री (Milk Sale) किमतीत प्रतिलिटर ३ ते ५ रुपयांपर्यंत वाढ (Milk Rate) होऊ शकते, असा अभ्यासपूर्ण अंदाज डेअरी उद्योगातून वर्तविण्यात येत आहे.

दुग्धोत्पादन क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या विविध घडामोडींचा अभ्यास करता भविष्यात दुधाचा पुरवठा वाढण्याऐवजी कमी होण्याचे संकेत मिळत आहेत, असे इंडियन डेअरी असोसिएशनचे म्हणणे आहे. सध्या संघटित डेअरी उद्योगातून रोज १५० लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो आहे. त्यात १० ते १५ लाख लिटरने घट होईल. याबाबत असोसिएशनचे पदाधिकारी चेतन नरके यांनी एक अभ्यास अहवाल तयार केला आहे.

Milk Rate
Milk Rate : ‘वारणा’ची गाय दूध खरेदीदरात ३ रुपये वाढ

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा अहवाल मागवून घेतला आहे. अहवालातील संभाव्य वाटचाल बघता राज्यात शासकीय पातळीवर नेमके कोणते धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत, याबाबत विरोधी पक्षनेते व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Milk Rate
Milk Rate : दूध संघाकडून खरेदी दरात ७० पैशांची वाढ

“लम्पीच्या काळात राज्यभर आठवडी बाजार बंद होते. त्यामुळे दुधाळ जनावरांची खरेदी- विक्री ठप्प होती. सततच्या पावसामुळे जनावरांना हिरवा व कोरडा चारादेखील वेळेत मिळाला नाही. लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरणामुळेही जनावरांमध्ये नेहमीचा बळकटपणा राहिला नाही. दुसऱ्या बाजूला पशुखाद्याचे दरदेखील २०-३० टक्क्यांनी वाढले. या सर्व घडामोडींमुळे जनावरांचे कुपोषण होत असून, त्यामुळेच दूध पुरवठ्यात घट झालेली आहे,” असे निरीक्षण गोकूळ दूध संघाच्या सूत्रांनी नोंदवले आहे.

दरम्यान, नरके यांच्या म्हणण्यानुसार, दुधाच्या पुष्ट काळात भुकटीची निर्मिती वाढते. मात्र यंदा पुष्ट काळातच दुधाचा तुटवडा जाणवतो आहे. त्यातून भुकटीची निर्मिती अपेक्षित प्रमाणात होणार नाही. त्यामुळे कृष काळात नैसर्गिक दुधाचा पुरवठा कमी होताना भुकटीचे साठेही कमी असतील. परिणामी, दुधाच्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा होणार नाही. यातून विक्रीदरात २ ते ३ रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ करावी लागेल. कृष काळ तीव्र असल्यास विक्रीदरातील वाढ ५ ते ६ रुपयांपर्यंत देखील राहू शकेल.

जनावरांच्या कुपोषणातून मोठे नुकसान

दुधाच्या मागणी व पुरवठ्याचे गणित लम्पी स्कीन साथीमुळे विस्कळित झालेले आहे, असे डेअरी उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लम्पी स्कीनमुळे दुधाळ जनावरे दगावली आहेत. मात्र, जनावरांच्या मृत्यूपेक्षाही डेअरी प्रकल्पांचे जास्त नुकसान जनावरांच्या कुपोषणातून होणार आहे.

राज्यात पुष्ट काळातच दुधाचे विक्रीदर वाढवावे लागले आहेत. सहसा असे होत नाही. त्यामुळे दुधाच्या पुढील कृष कालावधीत विक्रीदरात वाढ अपरिहार्य ठरेल. यावाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना कसा होईल, याची काळजी प्रत्येक दूध संघाला घ्यावी लागेल.
चेतन नरके, सदस्य, मध्यवर्ती कार्यकारी समिती, इंडियन डेअरी असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com