Chana Market : खानदेशात हरभरा दरात घसरण

Chana Rate : खानदेशात सर्व प्रकारच्या हरभरा दरात घट झाली. प्रमुख बाजार समित्यांतील आवकेत वाढ झाल्यामुळे दर कमी झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon

Jalgaon News : खानदेशात सर्व प्रकारच्या हरभरा दरात घट झाली. प्रमुख बाजार समित्यांतील आवकेत वाढ झाल्यामुळे दर कमी झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मोठा काबुली किंवा डॉलर (मेक्सिको), लहान काबुली व देशी हरभऱ्याची आवक खानदेशात वाढली आहे. मळणी सर्वच भागात ७० टक्क्यांवर पूर्ण झाली आहे.

काही भागांत मळणी व कापणीचे काम सुरू आहे. पुढेही आवक होईल, असे दिसत आहे. देशी हरभरा दरात सर्वप्रथम घट झाली. या हरभऱ्याचे दर (Harbhara Bhav) मागील महिन्याच्या सुरुवातीला किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रतिक्विंटल ५८०० ते ६३०० रुपये होते. परंतु मागील १० दिवसांत दर सतत कमी झाले असून, सध्या दर ५००० ते ५६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

Chana Market
Chana Harvesting : हरभरा पिके काढणीच्या अवस्थेत

मोठ्या काबुलीचे दर (Kabuli Chana Price) सुरुवातीला किंवा १० ते १२ दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल ११ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. मोठ्या काबुलीचे दर सध्या १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. लहान काबुलीचे दर ९१०० ते १०००० रुपये प्रतिक्विंटल असे होते. त्यातही घसरण झाली असून, लहान काबुलीचे दर सध्या ६४०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल असे झाले आहेत. खानदेशात देशी हरभऱ्याची सध्या रोज १३०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

Chana Market
Chana Production : हरभऱ्याला कमी उत्पादन, चांगल्या मागणीचा आधार

ही आवक मागील महिन्याच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत प्रतिदिन सरासरी ७०० क्विंटल होती. ही आवक सतत वाढली आहे. लहान काबुलीची आवक मागील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली. ती सुरुवातीला प्रमुख बाजार समित्यांत प्रतिदिन सरासरी ३०० क्विंटल होती.

परंतु लहान काबुलीची आवक सध्या प्रतिदिन सरासरी ७०० क्विंटलपर्यंत आहे. मोठ्या काबुलीची आवकही १३ ते १४ दिवसांपूर्वी सुरू झाली. सुरुवातीला चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर बाजार समितीत मिळून प्रतिदिन सरासरी १०० क्विंटल आवक मोठ्या काबुलीची होती. प्रमुख तीन बाजार समित्यांत ही आवक सध्या ६०० क्विंटल होत आहे.

आवकेत दुप्पट वाढ

आवक दुप्पट झाल्याचे दिसत आहे. यामुळे दरात घसरण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यातच या आठवड्यात सोमवारी (ता. २६) बाजार समित्या बंद होत्या. यामुळे कुठेही लिलाव झाले नाहीत. यानंतर हरभरा आवकेत मोठी वाढ झाली. पावसाचीही समस्या खानदेशात (Khandesh) ऐन काढणी, मळणीच्या वेळेस तयार झाली आहे. यामुळेदेखील शेतात मळणी झाल्यानंतर लागलीच हरभरा बाजारात पाठविला जात आहे. काही शेतकरी थेट किंवा शिवार खरेदीत हरभऱ्याची विक्री करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com