Sugar Production : कर्नाटकातही साखर उत्पादन घटीचे संकट

Sugar Season 2023 : साखर उत्पादनातील तिसऱ्या क्रमाकांचे राज्‍य असणाऱ्या कर्नाटकमध्येही यंदा साखर उत्पादन घटण्याचे संकट घोंघावत आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Kolhapur News : ः साखर उत्पादनातील तिसऱ्या क्रमाकांचे राज्‍य असणाऱ्या कर्नाटकमध्येही यंदा साखर उत्पादन घटण्याचे संकट घोंघावत आहे. येत्या हंगामातील राज्याचे साखर उत्पादन ४२ लाख टनांपर्यंत घसरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या हंगामात (२०२२-२३) ५९ लाख टन उत्पादन झाले होते.

यंदा कर्नाटकातही पावसाने दडी मारल्याने याचा विपरित परिणाम उसाच्या वाढीवरही झाला आहे. परिणामी एकरी उत्पादनातही घट होण्याची चिंता सतावत आहे. या घटीमुळे उसगाळप ५२० लाख टनापर्यंत खाली येईल, अशी शक्यता आहे. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत साखर उत्पादनात वीस टक्क्यांपर्यंत घट होण्‍याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी ७०५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. गेल्‍या हंगामात राज्याचा साखरेचा उतारा ९.९१ टक्क्यांपर्यंत होता. हा उतारा ८ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. कर्नाटकात गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामात ५५ टक्के पाऊस कमी झाला आहे. राज्‍यात एकूण ७८ साखर कारखाने आहेत.

महाराष्ट्रालगत असणारा बेळगाव जिल्हा हा सर्वाधिक ऊस क्षेत्र असणारा जिल्हा आहे. कोल्हापूर, सांगली जिल्‍ह्यांसारखीच भौतिक स्थिती असल्याने या जिल्‍ह्यात उसाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. बागलकोट, मांड्या, मैसूरु, शिवमोग्गा, दावणगेरे, हसन, कोप्पल, विजयपुरा, बीदर, बल्लारी आणि हावेरी आदी जिल्‍ह्यांत उसाचे उत्पादन चांगल्‍या प्रकारे घेतले जाते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sugar Production
Sugar Production : थायलंडमध्येही साखर उत्पादन घटणार

प्रत्‍येक वर्षी ऑक्टोंबरच्या मध्याला तेथील हंगाम सुरू होतो. यंदा १ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याची घोषणा कर्नाटक राज्याने केली. पण महाराष्ट्रानेही याच कालावधीत हंगाम सुरू करण्याचे निश्चित केल्यानंतर सीमाभागातील ऊस आपल्या कारखान्याला मिळावा यासाठी कर्नाटकनेही चलाखी करताना हंगाम सुरू करण्याचा कालावधी २५ ऑक्टोबरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. सीमाभागातील कर्नाटकच्या कारखान्‍यांना महाराष्ट्रातील ऊस उपलब्ध व्हावा यासाठी कालावधी लवकर करण्यात आला आहे.

Sugar Production
Sugar Production : सांगली जिल्ह्यात यंदा २० टक्क्यांनी साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता

सीमा भागातील ऊस तोडीसाठी प्रयत्न

उसाची अनुपब्‍लधता असल्याने कोणत्याही परिस्थितीत अपेक्षित गाळप हंगाम पूर्ण करण्यासाठी कारखाने प्रयत्न करत आहेत. यासाठीच उस हंगामही लवकर सुरू करण्यासाठी कर्नाटकात प्रयत्न करण्यात येत आहेत. पाऊस नसल्याने पाण्याच्या उपलब्धतेअभावी उसाची वाढ चांगली झाली नाही.

अधिकचे नुकसान टाळण्‍यासाठी ऊस उत्पादक तातडीने कारखान्यांकडे ऊस पाठविण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याचा लाभ घेण्यासाठी कर्नाटकातील साखर कारखाने प्रयत्न करत आहेत. लवकर हंगाम सुरू करून कर्नाटक, महाराष्ट्र सीमा भागातील ऊस तोडीसाठी कर्नाटकातील कारखान्यांकडून प्रयत्न होण्‍याची शक्यता आहे. पण एकूणच उसाची वाढ चांगली झाली नसल्याने उत्पादनात घट निश्चित असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com