Cotton Import: देशातील कापूस आयात उच्चांकी पातळीवर

Textile Industry: देशातील घटते उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाची आयात वाढली आहे. चालू हंगामात पहिल्या आठ महिन्यांमध्येच आयात गेल्या सहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोचली आहे. देशात २७ लाख गाठी कापूस आयात झाली.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News: देशातील घटते उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाची आयात वाढली आहे. चालू हंगामात पहिल्या आठ महिन्यांमध्येच आयात गेल्या सहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोचली आहे. देशात २७ लाख गाठी कापूस आयात झाली.

विशेष म्हणजे यंदा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ब्राझीलमधून जास्त आयात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही भाव कमी आहेत. त्यामुळे कापूस आयात आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे आयातदारांचे म्हणणे आहे.

Cotton Market
Cotton Import: ब्राझीलमधून वाढतेय कापूस आयात; भारताची आयात जास्त, निर्यात कमी

भारत कापूस निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. मात्र देशातील घटते उत्पादन आणि वाढता वापर यामुळे आयात वाढत आहे. देशातील कापूस उत्पादन यंदा गेल्या अनेक वर्षातील निचांकी पातळीवर पोचले. तर दुसरीकडे कापसाचा वापर स्थिर आहे. त्यामुळे भारताला कापूस आयात करून गरज पूर्ण करावी लागत आहे. दुसरे म्हणजे देशात उत्पादन कमी झाले, मात्र मागणी असल्याने दरही सुधारले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावातच होते. त्यामुळे देशात आयात वाढत आहे.

चालू हंगामात ऑक्टोबर २०२४ ते मे २०२५ या काळात २७ लाख गाठी कापूस आयात झाला. गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात १५ लाख गाठींची आयात झाली होती. यापूर्वी २०१८-१९ मध्ये ३५ लाख गाठी कापसाची आयात झाली होती. निर्यात मात्र गेल्या १८ वर्षांतील सर्वांत कमी दिसत आहे. आतापर्यंत देशातून केवळ १३ लाख गाठी कापूस निर्यात झाला. यापूर्वी २००८-०९ मध्ये निचांकी २३ लाख गाठी कापूस निर्यात झाली होती. यंदा एवढी निर्यातही होण्याची शक्यता कमीच असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

Cotton Market
Cotton Productivity : विशेष प्रकल्पातून देशात कापूस उत्पादकतेत वाढ

यंदा सर्वाधिक आयात ब्राझीलमधून झाली. कारण ब्राझीलच्या कापसाचे भाव कमी राहिले होते. ब्राझीलमधून यंदा आतापर्यंत साडेसहा लाख गाठी कापूस आयात झाला आहे. त्यानंतर अमेरिकेतून सव्वापाच लाख गाठी, ऑस्ट्रेलियातून पाच लाख गाठी, माली देशातून १ लाख ७९ हजार गाठी, इजिप्तमधून ८३ हजार गाठी कापसाची आयात झाली आहे. विशेष म्हणजे या सर्वच देशांमध्ये कापसाचे भाव भारतापेक्षा कमी होते. त्यामुळे देशात कापसाची आयात वाढली आहे.

देशातील कापूस आयात (गाठींत)

२०२४-२५* २७ लाख

२०२३-२४ १५ लाख

२०२२-२३ १४ लाख

२०२१-२२ २१ लाख

२०२०-२१ ११ लाख

२०१९-२० १५.५० लाख

(२०२४-२५* आकडा ऑक्टोबर ते मे महिन्याचा आहे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com