Agrowon Podcast : कापूस रेट, सोयाबीन बाजारभाव, हरभरा भाव, तूर मार्केट

Market Update : शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Market
MarketAgrowon

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली होती. सोयाबीन १२.२० डाॅलर प्रतिबशेल्सवर होते. तर सोयापेंड ३४६ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही प्रक्रिया प्लांट्सचे भाव काही मात्र स्थिर होते.

बाजार समित्यांमधील भावपातळी दबावातच असून ४३०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यान
होती. तर बाजातील आवकही टिकून आहे. पुढचे काही आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असेच चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात कापसाचे सरासरी भाव टिकून आहेत. देशात सध्या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजरातील आवक टिकून आहे. कालची बाजारातील आवक ८२ हजार गाठींवर होती, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.

वायद्यांमध्ये मात्र कापसात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ९३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील मे महिन्याचे वायदे ६२ हजार ६६० हजार प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमधील भावात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market
Agrowon Podcast : कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु


हरभऱ्याचे भाव सध्या टिकून आहेत. हरभरा उत्पादनात घटीचे अंदाज येत आहेत. त्यातच हरभऱ्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे हरभऱ्याला चांगला आधार मिळतोय. बाजारातील आवक हळूहळू वाढताना दिसतेय.

पण यंदा हरभऱ्याच्या आवकेचा दबाव कमीच राहू शकतो, असे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे सध्या हरभऱ्याला ५ हजार ४०० ते  ६ हजारांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. हा भाव आणखी काही काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Market
Agrowon Podcast : हळदीच्या बाजारातील सुधारणा कायम

हळदीच्या बाजारात चांगली तेजी आली आहे. यंदा हळदीची लागवड कमी झाली होती. त्यातच हळदीच्या पिकाला कमी पाऊस, जास्त उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला. आता हळद काढणी सुरु आहे. त्यामुळे उत्पादकतेतील घट पुढे येत आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून हळदीच्या भावातही वाढ दिसून आली.

हळदीचा सरासरी भाव बाजार समित्यांमध्ये आता १३ हजार ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. तर एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केंद्रांवरील भावपातळी १५ हजार ते १९ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. हळदीच्या भावातील सुधारणा पुढील काळातही कायम राहील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीच्या बाजारातील भावपातळी कायम आहे.  तुरीचे भाव ऐन आवकेच्या हंगामातही टिकून आहे. दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे. सरकार आयात वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. पण आयातीवर देखील मर्यादा दिसून येत आहे.  परिणामी तुरीची सरासरी भावपातळी ९ हजार ५०० ते १० हजार रुपयांच्या दरम्यान टिकून आहे.

यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे. यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com