Cotton Production: कापूस उत्पादकता हेक्टरी ४ क्विंटल २२ किलो प्रस्तावित

Cotton Yield: मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये यंदा हेक्टरी उत्पादनात वाढीचा अंदाज आहे. कृषी विभागाने हंगाम २०२४-२५ साठी कपाशीचे सरासरी उत्पादन ४ क्विंटल २२ किलो इतके प्रस्तावित केले असून, लातूर जिल्हा ५.५० क्विंटल हेक्टरी उत्पादकतेसह आघाडीवर आहे.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रुईची सरासरी हेक्टरी उत्पादकता ४ क्विंटल २२ किलो प्रस्तावित करण्यात आली आहे. गत वर्षी या जिल्ह्यांत हेक्टरी सरासरी उत्पादकता ३ क्विंटल ९९ किलो इतकी होती.

गत वर्षीच्या खरीप हंगामात छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत कपाशीचे क्षेत्र ९ लाख १८ हजार हेक्टर इतके होते. गत वर्षीच्या पीक कापणी प्रयोगानुसार सुमारे २१ लाख ५५ हजार टन रुईचे उत्पादन झाले होते. त्या वेळी सुमारे ३ क्विंटल ९९ किलो हेक्टरी रुईचे उत्पादन आले होते.

Cotton Production
Cotton Sowing Decline : मोताळ्यात शेतकऱ्यांचा कल मका, तूर, सोयाबीनकडे

यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन जिल्ह्यांत सुमारे ९ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्र कपाशीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. असे असले तरी कपाशी लागवडीत यंदा घटीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे प्रस्तावित क्षेत्रानुसार सुमारे २३ लाख टन रुई उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Cotton Production
CCI Cotton Sell : सीसीआयने महाराष्ट्रात विकला सर्वाधिक कापूस; तेलंगणात झाली उच्चांकी खरेदी

लातूर विभागात अधिक उत्पादकता

परभणी व नांदेड हे दोन जिल्हे प्रामुख्याने कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. २००९-१० मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर व धाराशिव या पाच जिल्ह्यांत रुईची हेक्‍टरी उत्पादकता २ क्विंटल ८ किलो इतकी होती. २०२४-२५ मध्ये हेक्टरी ३ क्विंटल ९० किलोवर उत्पादकता पोहोचली. यंदा खरिपासाठी पाचही जिल्ह्यांत कपाशीचे क्षेत्र ४ लाख ५५ हजार हेक्टर प्रस्तावित आहे.

नांदेड जिल्ह्यात २ लाख १० हजार हेक्टर, परभणीत १ लाख ९८ हजार हेक्टर, हिंगोलीत ३० हजार हेक्टर, लातूरमध्ये १६ हजार हेक्टर तर धाराशिवमध्ये प्रस्तावित केलेल्या १००० हेक्टर कपाशी क्षेत्राचा समावेश आहे. या पाचही जिल्ह्यांत उत्पादकता ४ क्विंटल २७ किलो प्रस्तावित आहे. नांदेड जिल्ह्यात हेक्टरी ४ क्विंटल, परभणीत ४ क्विंटल २७ किलो, हिंगोलीत ३ क्विंटल ७५ किलो, लातूरमध्ये ५ क्विंटल ५० किलो, तर धाराशिवला ३ क्विंटल ८३ किलो हेक्टरी उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com