Cotton Procurement Center : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीत वाढ करावी

Demand on Swabhimani Shetkari : परभणी जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळ खरेदी केंद्रावर दैनंदिन कापूस खरेदीत वाढ करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सीसीआयच्या छत्रपती संभाजीनगर येथील उपविभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे.
Swabhimani Shetkari Sanghtana
Swabhimani Shetkari SanghtanaAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) खरेदी केंद्रावर दैनंदिन कापूस खरेदीत वाढ करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सीसीआयच्या छत्रपती संभाजीनगर येथील उपविभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे.

Swabhimani Shetkari Sanghtana
Cotton Procurement : कापूस खरेदीसाठी करा दाखल्यानुसार स्थळपाहणी

परभणी जिल्ह्यातील मानवत, सेलू, जिंतूर या ठिकाणी सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू आहे. परभणी, गंगाखेड, पाथरी या तालुक्यांत कापूस पणन महासंघ खरेदी करीत होते.

Swabhimani Shetkari Sanghtana
Cotton Procurement Center : शहादा येथील कापूस खरेदी केंद्रास अल्प प्रतिसाद

परंतु या वर्षी त्यांच्याकडे कर्मचारी कमी असल्यामुळे त्यांची या तालुक्यात खरेदी बंद आहे. त्यामुळे मानवत, सेलू येथे जास्त कापसाची आवक वाढली आहे. त्यात आपल्या केंद्रामार्फत फक्त रोजचे कमीत कमी २०० ते ३०० क्विंटल कापूस खरेदी केला जातो.

शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही. मानवत, सेलू तालुक्यांतील खरेदी केंद्रावर खरेदी वाढवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोडे, माणिक सूर्यवंशी, मयूर वाघमारे, नीलेश साबळे, दीपक गरुड, एकनाथ भालेराव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com