Cotton Market : कापूस दर पुढील काळात वाढतील का?

चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन घटले. तसेच गेल्या हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला होता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे.
Cotton Market
Cotton Market Agrowon
Published on
Updated on

Cotton Rate Update : चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन (Cotton Production) घटले. तसेच गेल्या हंगामात शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला होता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कापसाची आवक जास्त राहिल्याने दर दबावात आले.

मागील तीन दिवसांमध्ये कापूस दर (Cotton Rate) वाढले. पुढील काळातही कापूस सुधारू शकतात अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशात यंदाही कापसाचे उत्पादन कमीच राहील, हे जवळपास ऑक्टोबरमध्येच स्पष्ट झाले होते. शेतकरी उत्पादकता कमी आल्याचे सांगत होते. पण उद्योगांनी याच काळात विक्रमी उत्पादनाची टिमकी वाजवली. त्यामुळे बाजार दबावात ठेवण्याचा प्रयत्न झाला.

पण मागील हंगामात कापसाचा तुटवडा होता. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १२ हजारांपर्यंत दर पाहायला मिळाले.

Cotton Market
Cotton Market : कापड मार्केट स्थिर मात्र कापूस बाजार अस्थिर

परंतु हा भाव शेवटच्या टप्प्यात मोजक्या मालाला मिळाला. पूर्ण हंगामाचा विचार करता प्रत्यक्षात बहुतांश शेतकऱ्यांना ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये भाव मिळाला होता.

गेल्या वर्षीचे भाव बघता यंदा किमान १० हजारांचा भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे शेतकरी सुरुवातीच्या टप्प्यात कापूस विकत नव्हते. पण उद्योगांना कापसाची गरज होती. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कापसाचे भाव ९ हजारांच्याही पुढे गेले.

चालू हंगामातील सरासरी कापूस दर

महिना…सरासरी दर

ऑक्टोबर…८०००

नोव्हेंबर….८६००

डिसेंबर…८४५०

जानेवारी…८२००

फेब्रुवारी…८१००

मार्च…७८००

Cotton Market
Cotton Market : कापड मार्केट स्थिर मात्र कापूस बाजार अस्थिर

डिसेंबर आणि जानेवारीतही बाजारातील आवक कमी राहीली. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी विक्री वाढवली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सरासरीच्या तुलनेत आवक दुप्पट राहीली. याचा दबाव बाजारावर आला.

त्यामुळे कापसाच्या सरासरी भावात एक हजार रुपयांपर्यंत घट झाली. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारातही बॅंकिंग संकटामुळं मंदी आली होती. पण ही स्थिती जास्त काळ राहणार नाही, असे ‘ॲग्रोवन’ने त्या वेळीच सांगितले होते.

तसेच कापसाचे दर वाढतील असाही अंदाज तज्ज्ञांच्या हवाल्याने दिला होता. त्यानुसार चालू आठवड्यात कापसाचे दर वाढल्याचे दिसून आले.

दर का वाढू शकतात?

देशात यंदा ३१३ लाख गाठी कापूस उत्पादनाचा सध्याचा अंदाज आहे. त्यात पुढील काळात आणखी कपातही होऊ शकते. आजघडीला जवळपास २०० लाख गाठी कापूस बाजारात आल्याचा अंदाज आहे. म्हणजेच फक्त ११३ लाख गाठी कापूस बाहेर आहे.

हा सर्व कापूस शेतकऱ्यांकडे नाही. व्यापारी, स्टाॅकिस्ट, शेतकरी, जिनिंग आणि खेडा खेरदीवाले छोटे शेतकरी यांच्याकडे हा स्टाॅक आहे. शेतकऱ्यांकडे सध्या केवळ २० ते २५ टक्के कापूस असल्याचं सांगितलं जातं.

यापैकी आणखी काही कापूस पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये बाजारात येईल. त्यानंतर आवक कमी होईल. या काळात उद्योगांना दर वाढवल्याशिवाय कापूस मिळणार नाही. त्यामुळे चालू महिन्यात कापूस दरात सुधारणा दिसेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

कापूस भाववाढीसाठी पोषक घटक

- देशातील घटलेले उत्पादन

- शेतकऱ्यांकडील कमी झालेला स्टाॅक

- येत्या हंगामात कापूस लागवड कमी होण्याचा अंदाज

- आंतरराष्ट्रीय पातळीवरही लागवड घटण्याची शक्यता

- देशातील उद्योगांची वाढलेली क्षमता

- बांगलादेशसह शेजारच्या देशांमधील घटलेले उत्पादन

- देशातील लग्नसराई आणि समारंभामुळे कापडाला उठाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com