Cotton Arrival : प्रक्रिया उद्योगाची कापूस आवक ५५ टक्क्यांनी घटली

दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठेबाजी केली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांकडील आवक सरासरी ५५ टक्क्यांनी घटल्याची माहिती सावनेर तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग मालकांनी दिली.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Cotton Market Update नागपूर : दरवाढीच्या (Cotton Rate) अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठेबाजी केली आहे. त्यामुळे प्रक्रिया (Cotton Processing) उद्योजकांकडील आवक सरासरी ५५ टक्क्यांनी घटल्याची माहिती सावनेर तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग मालकांनी दिली. त्यामुळे ऐन हंगामात प्रक्रिया उद्योगांचा परिसर ओस पडला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावनेर तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक लाख ११ हजार ३०१ क्विंटल कापसाची आवक (Cotton Arrival) कमी झाली आहे.

Cotton Market
Cotton Market : कापसासाठी मार्च महिना महत्वाचा

एक ऑक्टोबर २०२१ ते ९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत चार लाख ३७ हजार ६४३ क्विंटल कापसाची आवक झाली होती. यावर्षी एक ऑक्टोबर २०२२ ते ९ फेब्रुवारी २०२३ या काळात तीन लाख २६ हजार ३४२ क्विंटल कापूस बाजारात आल्याची माहिती जिनिंग प्रेसिंग उद्योगातील सूत्रांनी दिली.

Cotton Market
Cotton Export : कापूस निर्यात सुरळीत; सुतगिरण्याही फायद्यात

गेल्या वर्षी कापसाला सरासरी ११००० रुपये प्रति क्विंटल रुपयांचा दर मिळाला होता. त्यामुळेच दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. अशातच केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कापसाचे दर सुरुवातीपासून दबावात आहेत.

सध्या कापसाला सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, अशी अपेक्षा कापूस उत्पादकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी विक्री थांबविली.

परिणामी प्रक्रिया उद्योजकांकडे येणारी कापसाची आवक कमी झाली आहे. त्याच्या परिणामी बाजारातील आवक ५५ टक्के कमी झाली असून जिनिंग प्रक्रिया उद्योग यामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

अशी आहे आवक

गेल्या वर्षी बाजारात रोज ४१ ते १२५ गाड्या कापसाची आवक होत होती. यावर्षी ही आवक दहा ते ५५ गाड्यांवर आली आहे.

गेल्या हंगामात बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग येथे ४८ हजार ६२४ क्विंटल, श्रीकृष्ण कॉटन माळेगाव येथे एक लाख ३६ हजार ८७४, खैरी येथे २०९४६७, विजयालक्ष्मी कॉटन मंगसा ४०१३१, व्हाइट क्लीप सावनेर येथे २५४४ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती.

यावर्षी बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग सावनेर येथे १६८९७, श्रीकृष्ण कॉटन माळेगाव येथे एक लाख २१ हजार ३८, कनक कॉटन खैरी येथे १,५९,६१२.३७, विजयालक्ष्मी कॉटन मंगसा येथे २८ हजार ७९३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com